शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना’चा प्रसार थांबविणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य - डॉ. निलेश टापरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 18:32 IST

खामगाव उपजिल्हा सामान्य  रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी  डॉ. निलेश टापरे यांच्याशी साधलेला संवाद...

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोना या विषाणूजन्य आजाराने जगभर हाहाकार माजविला आहे. कोरोना हा विषाणू प्रामुख्याने संसर्ग झालेल्या व्यक्तीशी ती खोकताना किंवा शिंकताना संपर्क आल्यास पसरतो. त्यामुळे संपर्क टाळणे  आणि कोरोनाचा प्रसार थांबविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. खामगाव उपजिल्हा सामान्य  रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी  डॉ. निलेश टापरे यांच्याशी साधलेला संवाद...

कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी उपाययोजना काय?कोरोना हा आजार प्रामुख्याने संपर्कातून तसेच विषाणू असलेल्या वस्तूला स्पर्श करून त्यानंतर तिच्या डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करतो त्यावेळी हा आजार पसरतो. या आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी संपर्क टाळणे जितके गरजेचे आहे, तितकेच वारंवार हात धुणे गरजेचे आहे. खोकताना आणि शिंकताना  टिशूने नाक झाकून घ्यावे. हात स्वच्छ नसल्यास नाकाला किंवा तोंडाला स्पर्श करू नये. तसेच आजारी असलेल्या रूग्णांशी नजीकचा संपर्क टाळा.

कोरोनाच्या अनुषंगाने उपजिल्हा रूग्णालयात उपलब्ध सुविधा काय ?कोरोना या विषाणूचे संशयीत रूग्ण खामगाव आणि परिसरात आढळून आल्यानंतर कोरोना संसर्गाच्या रूग्णासाठी आयसोलेशन कक्ष तयार करण्यात आला. सुरूवातीला या कक्षात १० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, संभाव्य परिस्थिती आणि धोका लक्षात घेता   आयसोलेशन कक्षात आणखी ४० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोनाच्या अनुषंगाने  रूग्णालयात विशेष पथक कार्यरत आहे का?अजिबात नाही, रूग्णालयात कार्यरत असलेला स्टापच आयसोलेशन कक्षात दाखल  रूग्णांची काळजी घेत आहे. योग्य तो औषधोपचार त्यांच्यावर करण्यात येत आहे. सोबतच संशयीत रूग्णांची वेळीच नोंद घेत, कम्युनिटी स्प्रेडचा धोका टाळण्यासाठी रूग्णालय प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. रूग्णालयाच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी समाधान व्यक्त केले आहे.‘

कोरोना म्हणजेच कोविड-१९ हा नवीन विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा फ्यू सारखा संसर्गजन्य आजार असून, खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. सुरूवातीला काही दिवस ही लक्षणे दिसून येत नाहीत.

खामगाव येथून किती रूग्णांचे अहवाल पाठविले?कोरोना या विषाणूचे संक्रमन वाढीस लागल्यानंतर खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयातून १६ जणांचे स्वाब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी आतापर्यंत १५ जणांचे अहवाल प्राप्त झालेत. आनंदाची बाब म्हणजे या सर्वच १५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर एक अहवाल सद्यस्थितीत प्रलंबित आहे. शुक्रवारी एका वयोवृध्द महिलेचा आयसोलेशन कक्षात मृत्यू झाला. खबरदारी म्हणूनही या महिलेचाही स्वाब नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. उपजिल्हा सामान्य रूग्णालयाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसinterviewमुलाखत