शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आयकर अधिकारी असल्याचे भासवले, २० लाखांच्या बदल्यात ४० लाखांच्या खोट्या नोटा देऊन फसवले

By सदानंद सिरसाट | Updated: November 6, 2022 20:42 IST

बनावट नोटा देऊन फसवले, चितोड्यातील तिघांना मुंबईत अटक

खामगाव (बुलढाणा) : आयकर अधिकारी असल्याचे भासवून कारवाईतील ४० लाख रुपये आहेत, ते घेऊन केवळ २० लाख रुपये द्या, असा बनाव करत पुण्यातील एकाची मुंबईत फसवणूक केल्याप्रकरणी खामगाव तालुक्यातील चितोडा अंबिकापूर येथील सरपंच पतीसह तिघांना माटुंगा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, मुख्य आरोपी असलेला सरपंच देवराव भाऊराव हिवराळे याच्याविरोधात राज्यभरात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

पुणे येथील रामदास दत्तात्रय बल्लाळ यांनी मुंबईतील माटुंगा ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये आरोपींनी आयकर अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्याकडे कारवाईत जप्त केलेल्या नोटा आहेत. त्या बदलवून द्यायच्या आहेत. त्यासाठी २० लाख रुपयांच्या मोबदल्यात ४० लाख रुपये देणार असल्याचे आश्वासन दिले. त्यासाठी बल्लाळ यांच्यासोबत मुंबईतील नामांकित व महागड्या ओबेरॉय, ट्रायडंट, प्रीतम हॉटेल याठिकाणी भेटी घेतल्या. तसेच बल्लाळ यांना मर्सिडिज, फॉर्च्युनरसारख्या आलिशान कारमधून फिरवले.

विश्वास संपादन झाल्यानंतर बल्लाळ यांच्याकडून २० लाख रुपये रोख घेण्यात आले. त्याबदल्यात त्यांना `भारतीय बच्चो का बँक' असे लिहिलेल्या बनावट नकली नोटा दिल्या. त्याद्वारे फिर्यादीची फसवणूक केली. याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल गौड, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप-निरीक्षक प्रशांत कांबळे, सहायक फौजदार जयेंद्र सुर्वे यांनी कौशल्यपूर्वक तांत्रिक तपास केला. त्यामध्ये चितोडा येथील सरपंच पती देवराव भाऊराव हिवराळे (३५), रविकांत जनार्दन हिवराळे (३६), योगेश वासुदेव हिवराळे (३२) यांना अटक केली. तर त्यांच्यासोबतचा एक आरोपी फरार झाल्याची माहिती आहे.

- दहा जणांची टोळीआमिष देऊन फसवणूक करण्याचा गोरखधंदा राज्यभरात करण्यासाठी या टोळीमध्ये दहा जण असल्याची माहिती आहे. तर मुंबईतील फसवणुकीच्या घटनेत चौघांचा समावेश आहे. त्यापैकी तिघांनाच अटक झाली. चवथा फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

- राज्यातील अनेक ठाण्यात गुन्हे दाखलमुंबईत अटक केलेला मुख्य आरोपी देवराव भाऊराव हिवराळे याच्याविरुद्ध राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली. आराेपींनी आणखी किती जणांची फसवणूक केली, याचा तपासही माटुंगा पोलिसांकडून केला जात आहे. त्यामुळे आता आरोपींचे सर्वच गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी