शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सध्याचे सरकार असंवेदनशील - माणिकराव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:42 IST

काँग्रेसने राज्यभरात  जनआक्रोष आंदोलन सुरू केले असून, अमरावती येथे सात  नोव्हेंबर रोजी जनआक्रोश मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी येथे दिली.

ठळक मुद्देसात नोव्हेंबर रोजी अमरावतीत येथे काँग्रेसचा जनआक्रोश  मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सध्याचे सरकार हे असंवेदनशील असून, शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना दिलासादायक असे काम या सरकारने  गेल्या तीन वर्षांत केलेले नाही. त्याविरोधात काँग्रेसने राज्यभरात  जनआक्रोष आंदोलन सुरू केले असून, अमरावती येथे सात  नोव्हेंबर रोजी जनआक्रोश मेळावा आयोजित करण्यात  आल्याची माहिती विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे  यांनी येथे दिली.काँग्रेस कार्यालयात आयोजित  पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  यावेळी जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा आ. राहुल बोंद्रे,  मेळाव्याचे समन्वयक श्याम उमाळकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, संजय राठोड,जि.प. सदस्य अँड. जयश्री शेळके,  माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, शैलेश सावजी, लक्ष्मणराव  घुमरे उपस्थित होते. कर्जमाफीची घोषणा करून पाच महिने झाले,  तरी प्रत्यक्षात शेतकर्‍यांना कुठलाही दिलासा नाही. अधिवेशना पर्यंत शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्यास आम्ही भाग पाडू,  असे ठाकरे यावेळी म्हणाले. कीटकनाशकामुळे शेतकर्‍यांचा मृ त्यू झाल्याप्रकरणी मूळ कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे,  यासह अन्य मागण्यांसाठी हा जनआक्रोश मोर्चा असल्याचे ते  म्हणाले. सोबतच संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांवरही कारवाई  करण्यात यावी, अशी  मागणी असल्याचे ते म्हणाले. वर्तमानात  समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.  वादग्रस्त राणी पद्मावती चित्रपटात वास्तव चित्रण असावे, जन तेच्या भावनांचा विचार करता वादग्रस्त सीन काढून टाकावे,  असेही ते म्हणाले. 

अधिवेशनावर काँग्रेसची दिंडी अधिवेशनादरम्यान काँग्रेस मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश मार्गे  अधिवेशनावर दिंडी काढणार आहे. २६ किंवा २७  नोव्हेंबरदरम्यान या दिंडीस प्रारंभ होणार असल्याचे संकेत  माणिकराव ठाकरे यांनी दिले. याची अद्याप अधिकृत घोषणा  झाली नसली, तरी प्रदेश काँग्रेसतर्फे ती लवकरच करण्यात येणार  असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस