शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘मातृवंदन’ योजनेच्या लाभासाठी  गर्भवती महिलांची १५० दिवसात नोंदणी आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 14:13 IST

 बुलडाणा : माता व बालमृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त  ‘मातृवंदन’ योजनेच्या लाभासाठी गर्भवती महिलांची १५० दिवसाच्या आत नोंदणी करणे अनिवार्य राहणार आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यामध्ये ३४८ आरोग्य केंद्राअंतर्गंत या योजनेस नववर्षापासून प्रारंभ होत आहे. 

ठळक मुद्देयोजनेची अंमलबजावणी १ जानेवारी २०१८ पासून होणार असून त्याचा लाभ बुलडाणा जिल्ह्यातील ३४८ आरोग्य केंद्राअंतर्गंत देण्यात येणार आहे.या योजनेअंतर्गंत महिलांना तिन टप्प्यात ५ हजार रूपयांचे अनुदान केंद्र शासनातर्फे देण्यात येणार आहे. सदर योजनेचा लाभ नोकरदार महिला सोडून सर्व गटातील महिलांना मिळणार आहे.

- हर्षनंदन वाघ

 बुलडाणा : माता व बालमृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त  ‘मातृवंदन’ योजनेच्या लाभासाठी गर्भवती महिलांची १५० दिवसाच्या आत नोंदणी करणे अनिवार्य राहणार आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यामध्ये ३४८ आरोग्य केंद्राअंतर्गंत या योजनेस नववर्षापासून प्रारंभ होत आहे. दुसरीकडे  जिल्ह्यात मानवविकास  कार्यक्रमाअंतर्गंत ७ तालुक्यात गर्भवती महिलांसाठी उपक्रम राबविण्यात येत आहे. जननी सुरक्षा योजनाही जिल्ह्यात सुरू आहे. या योजनेअंतर्गंत लाभ घेणाऱ्या  गर्भवतींनाही   ‘मातृवंदन’ योजनेचा लाभ मिळणे अपेक्षीत आहे. जिल्ह्यात अजूनही माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण अपेक्षेच्या तुलनेत कमी झालेले नाही. विशेषता ग्रामीण भागामध्ये वर्षाकाठी १०० पेक्षा अधिक बालमृत्यू होतात. या पृष्ठभूमिवर मातृवंदन योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणे अपेक्षीत आहे. मात्र या योजनेच्या लाभासाठी गर्भवती महिलेस १५० दिवसाच्या आत नोंदणी करणे आवश्यक आहे. या योजनेची अंमलबजावणी १ जानेवारी २०१८ पासून होणार असून त्याचा लाभ बुलडाणा जिल्ह्यातील ३४८ आरोग्य केंद्राअंतर्गंत देण्यात येणार आहे.ग्रामीण भागातील गर्भवती महिलांची गर्भावस्थेत योग्य काळजी घेतली जावी, त्यांना सकस आहार देण्यात यावा, या उद्देशाने गर्भवती महिलांना मदत करण्याकरिता केंद्र शासनातर्फे १ जानेवारी २०१८ पासून मातृवंदन योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गंत महिलांना तिन टप्प्यात ५ हजार रूपयांचे अनुदान केंद्र शासनातर्फे देण्यात येणार आहे. सदर योजनेचा लाभ नोकरदार महिला सोडून सर्व गटातील महिलांना मिळणार आहे. मात्र या व्यक्तीरिक्त जननी सुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच अनुदान देण्यात येणार आहे. सदर रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खाते, पोस्ट खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी परिसरातील आरोग्य केंद्राचे लसीकरण कार्ड असणे आवश्यक आहे.

 तिन टप्प्यात लाभ गर्भवती महिलेस मातृवंदन योजनेचा लाभ ३ टप्प्यात मिळणार आहे.  नोंदणी झाल्यानंतर सदर महिलेस पहिल्या टप्प्यातील १ हजार रूपये देण्यात येणार आहे. त्यांनतर सहा महिने पूर्ण झाल्यावर दुसºया टप्प्यातील २ हजार रूपये देण्यात येणार आहे. त्यावेळी गर्भवती महिलेची तपासणी करण्यात येईल. तर प्रसुतीनंतर बालकाची जन्मनोंद केल्यानंतर लसीकरण पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या  टप्प्यातील दोन हजार रूपयांची रक्क देण्यात येणार आहे.

३४८ आरोग्य केंद्राअंतर्गंत अंमलबजावणीगर्भवती महिलेस मातृवंदन योजनेचा लाभ बुलडाणा जिल्ह्यातील ३४८ आरोग्य केंद्राअंतर्गंत मिळणार आहे. यासाठी सदर महिलेने आपल्या परिसरातील आरोग्य केंद्रावर आरोग्य सेविका, आशा तसेच अंगणवाडी सेविका त्यांच्या मदतीने गर्भवती झाल्यापासून १५० दिवसाच्या आत नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यात येणाऱ्या  आरोग्य केंद्रामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र, २८० आरोग्य उपकेंद्र, १२ ग्रामीण रूग्णालये, ३ उपजिल्हा रूग्णालय तसेच १ जिल्हा सामान्य रूग्णालय असे एकूण ३४८ आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाHealthआरोग्य