शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दुग्धोत्पादकांना प्राधान्याने पतपुरवठा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 11:39 IST

Buldhana News : दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना बँकांनी प्राधान्याने पतपुरवठा करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्यावर्षी केंद्राने कृषी क्षेत्रासाठी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील दुग्धोत्पादकांना पशूंच्या संगोपनासाठी प्रती जनावर २० हजार रुपयांप्रमाणे महत्तम पातळीवर तीन लाख रुपयांपर्यंत पतपुरवठा करण्याच्या योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजाणी झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना बँकांनी प्राधान्याने पतपुरवठा करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. यासंदर्भात जिल्हा दूध संघ, बँकर्स समितीचे अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत २९ मे रोजी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. त्यात उपरोक्त निर्देश देण्यात आले. या बैठकीस अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ, जिल्हा दूध संघाचे समाधान शिंगणे, संचालक रमेश पाटील, सहायक निबंधक रमेश भोयर (पदुम), जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे सीईओ डॉ. अशोक खरात यांच्यासह अन्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्राने गेल्या वर्षी मे महिन्यात कृषी क्षेत्रासाठी एक लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. त्याअंतर्गत पशुपालन, मत्स्य व्यवसायासाठी १५ हजार कोटींची घोषणा केली होती. त्याअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील पशुपालनासाठी प्रती जनावर २० हजार रुपये प्रमाणे वित्तपुरवठा किसान क्रेडिट कार्डअंतर्गत करण्यात येणार होता. कमाल १५ गुरांसाठी तीन लाख रुपयांपर्यंतचा हा पतपुरवठा करण्याची मर्यादा होती; पण प्रत्यक्षात यासाठी बँकांकडे गेलेल्या प्रकरणांमध्ये अत्यल्प प्रमाणात पतपुरवठा झाला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा दूध संघाच्या मार्फत दुग्धोत्पादन करणाऱ्या पशुपालकांना प्राधान्याने पतपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली होती. हा मुद्दा घेऊन २९ मे रोजी अनुषंगिक बैठक घेण्यात आली होती. त्यामुळे दुग्धोत्पादकांना प्राधान्याने पतपुरवठा करण्याबाबत अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी निर्देशित केले आहे. दरम्यान यापूर्वीच्या पतपुरवठ्याच्या परतफेडीसंदर्भातील अडचणीही यावेळी त्यांनी जाणून घेतल्या. जिल्हा दूध संघांतर्गत एकूण १५०० दूध उत्पादक शेतकरी सभासद आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी