शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

वीज तुटीचा फटका शेतकऱ्यांना !

By admin | Updated: May 14, 2017 04:04 IST

सिंचनासाठी शेतकरी रात्री शेतात

बुलडाणा : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उन्हाळ्यात विजेची मागणी वाढली आहे. मागणीनुसार पुरवठा होत नसल्यामुळे विजेचा तुटवडा निर्माण झाला असून, याचा फटका मात्र शेतकर्यांना बसत आहे. महावितरणने कृषी पंपांना देण्यात येणार्या विजेत कपात केली असून, दिवसा वीज पुरवठा बंद ठेवून रात्रीच्या सुमारास सुरू करण्यात येत आहे. दरवर्षी राज्यात उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्यामुळे तुटवडा निर्माण होतो. यावर्षीही विविध कारणांमुळे विजेच्या मागणी आणि पुरवठय़ात तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे महावितरणच्यावतीने भारनियमन करण्यात येत आहे. मात्र, भारनियमन करीत असताना नागरी वस्तीला जास्तीत जास्त वीज देण्याचे धोरण अवलंबविण्यात आले असून, कृषी पंपांना वीज देण्याला दुय्यम दर्जा देण्यात आला आहे. सध्या शेतांमध्ये संत्रा, पपई, मोसंबी, डाळिंब, केळी ही फळपिके आहेत. तसेच उन्हाळी पीकही शेतकरी मोठय़ा प्रमाणात घेत आहेत. वर्हाडात मोठय़ा प्रमाणात संत्र्याचे पीक घेतले जाते. उन्हाळ्यामध्ये या झाडांना पाणी देण्याची नितांत गरज असते. या झाडांना पाणी मिळाले नाही, तर वर्षानुवर्षांपासून वाढविलेली झाडे सुकतात व शेतकर्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. महावितरणच्यावतीने मात्र कृषी पंपांना वीज देण्याला दुय्यम स्थान देण्यात आले असून, भारनियमनात वाढ करण्यात आली आहे. विजेचे नियोजन करण्यासाठी कृषिग्राहकांच्या वीज उपलब्धतेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. कृषी पंपांना कमी प्रमाणात वीज देण्यात येत असून, दिवसभर वीज पुरवठा बंद असतो, तर रात्रीच्या वेळी वीज देण्यात येते. वीज स्थिती बदलताच कृषी पंपांना दिवसा आठ तास व रात्री १0 तास वीज पुरवठा करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.महावितरणला महानिर्मितीसह विविध स्रोतांकडून वीज पुरवठा होतो. परंतु विविध कारणांमुळे सुमारे चार हजार मेगावॉटपर्यंत विजेची उपलब्धता कमी असतानाही महावितरणने १५00 मेगावॉटपर्यंत आवश्यकतेनुसार भारनियमन केले आहे.राज्यातील काही संच तांत्रिक कारणांमुळे बंद असून, सदर संच सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत. यासोबतच इतर स्रोतांमधूनही विजेची उपलब्धता वाढविण्यात येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेले तात्पुरते भारनियमन लवकरच बंद करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.