चिखली (जि. बुलडाणा): कंत्राटदाराचा मनमानी कारभार व वाढत्या विजेची समस्या याचा फटका सर्वसामान्य वीज ग्राहकांना बसत असून चुकीच्या पद्धतीने रिडिंग घेतल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले आली आहे. तर शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून अनेक भागातील वीज तब्बल १२ तास गूल राहत असल्याच्या तक्रारीची दखल घेत शिवसेनेने याप्रकरणी १0 जून रोजी वीज अभियंत्यास घेराव घालून जाब विचारला.गेल्या काही दिवसांपासून अवेळी वीज गूल होण्याचे प्रकार वाढले असून गत दोन महिन्यांपासून भरमसाट बिल ग्राहकांच्या मस्तकी मारल्या जात आहे. कंत्राटदाराकडून अवेळी व मनमानीपणे विद्युत रिंडिग घेतल्या फटका नागरिकांना बसत आहे. ही बाब गत महिन्यात उघड होऊनही वीज अभियंत्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने यावेळी ग्राहकांना प्रमाणापेक्ष दुप्पट जास्त बिले देण्यात आली आहे. ही बाब नागरिकांनी शिवसेना शहर प्रमुख नीलेश अंजनकर यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी तातडीने वीज वितरण कार्यालय गाठून अभियंत्यास घेराव टाकून जाब विचारला. दरम्यान, विजेच्या समस्यांची सोडवणूक करण्याची ग्वाही अभियंता मिङ्म्रा यांनी दिल्यानंतर शिवसैनिकांनी नमते घेत विजेच्या समस्यांची तातडीने सोडवणूक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी न.प. उपाध्यक्ष ङ्म्रीराम झोरे, उपशहरप्रमुख प्रीतम गैची, दत्ता सुसर, पिंटू गायकवाड, विकी नकवाल, आनंद गैची, सोमेश जयस्वाल, प्रशांत दांडगे, दीपक सोनवाल, गणेश ङ्म्रीवास्तव, अंकुश मोहिते, धिरज टुनलाईट, किशोर नेवरे, कपिल वाघ, सतनामसिंग वधवा यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
वीज अभियंत्यास घेराव
By admin | Updated: June 11, 2016 02:45 IST