शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाण्याच्या एसपींच्या बदलीची शक्यता, नवीन नाव गुलदस्त्यात

By भगवान वानखेडे | Updated: September 13, 2022 13:17 IST

महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणीवसांच्या सरकारने आता कुठे स्थैर्य प्राप्त केले आहे, तोच आता आपआपल्या सोईनुसार मोठ्या अधिकाऱ्यांची फिल्डींग लावण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

बुलढाणा : राज्यातील सत्ता पालटानंतर आता शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा महापूर सुरु होणार आहे. यामध्ये महसूल आणि गृह विभागात मोठे फेरबदल होऊ घातले आहेत. त्यात बुलढाण्याच्या एसपींच्या बदलींचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलीस विभागातील हे फेरबदल याच आठवड्यात होणार असले तरी अद्याप नवीन पोलीस अधीक्षकांचे नाव गुलदस्त्यात आहे.

महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणीवसांच्या सरकारने आता कुठे स्थैर्य प्राप्त केले आहे, तोच आता आपआपल्या सोईनुसार मोठ्या अधिकाऱ्यांची फिल्डींग लावण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच गृह आणि महसूल विभागातील आवडीचे,सोबतच कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असून, हे फेरबदल याच आठवड्यात वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांपासून सुरु होणार आहेत. बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांचाही जिल्ह्यातील दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असल्याने त्यांचीही याच आठवड्यात बदली होणार असल्याची विश्वसनिय माहिती आहे.

टप्प्या-टप्प्याने होणार बदल्या२० सप्टेंबरपर्यंत गृह विभागात मोठे फेरबदल होऊ घातले आहेत. अशातच जिल्ह्यातील एसपींच्या बदलींनंतर टप्प्या-टप्प्याने इतर अधिकाऱ्यांच्या आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. हे बदल अनेकांच्या हिताचे तर अनेकांच्या पथ्थ्यावर पडणार आहेत.

अपर पोलीस अधीक्षकांसह तीन डीवायएसपी मिळणार?बुलढाणा पोलीस दलात अपर पोलीस अधीक्षकांसह देऊळगाव राजा उपविभागीय पोलीस अधिकारी,होम डीवायएसपीसह आर्थिक गुन्हे शाखेच्या डीवायएसपींचेही पद रिक्त आहे. तेव्हा या फेरबदलात बुलढाणा जिल्ह्याला कायमस्वरुपी अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मिळतात का? हे येणारा काळच सांगणार आहे.

बदल्यांचा निर्णय हा वरिष्ठ स्तरावरुन होणार आहे. वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयांचे पालन करावेच लागते. आदेश केंव्हा निघणार याबाबत काही सांगता येत नाही.-अरविंद चावरीया,जिल्हा पोलीस अधीक्षक,बुलढाणा. 

टॅग्स :PoliceपोलिसState Governmentराज्य सरकारTransferबदली