शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

सामाजिक ऐक्य परिषदांचे सकारात्मक परिणाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 13:46 IST

संवेदनशील शहर आणि ग्रामीण भागातही या परिषदांमुळे सामाजिक सलोखा राखल्या जात असल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे. 

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: समाजात एकोपा आणि शांतता प्रस्थापित करण्याचा मुख्य उद्देश असलेल्या सामाजिक ऐक्य परिषदांचे बुलडाणा जिल्ह्यात सकारात्मक परिणाम येत असल्याचे चित्र  आहे. विविध धार्मिक सण, उत्सव आणि इतर सामाजिक सणांच्यावेळी आयोजित सामाजिक ऐक्य परिषदांमुळे समाजातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी मदत होत असल्याचे दिसून येते. संवेदनशील शहर आणि ग्रामीण भागातही या परिषदांमुळे सामाजिक सलोखा राखल्या जात असल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे. पोलिस प्रशासनाकडून समाजात वेळप्रसंगी कायद्याचा बडगा उगारल्या जातो.  समाजातील अपप्रवृत्तींना वठणीवर आणण्यासाठी कायद्याचा धाक आवश्यक असतो. मात्र, काहीप्रसंगी पोलिसांमधील मानविय दृष्टीकोन काम करून जातो.  प्रेम आणि आत्मिय भावनेमुळे अट्टल गुन्हेगार सुधारल्याची अनेक उदाहरणे समाजासमोर आहेत. व्यक्ती सोबतच समाजाच्या बाबतीतही हीच बाबू लागू पडते. त्यामुळे गत काही दिवसांमध्ये बुलडाणा जिल्हा पोलिस प्रशासनाकडून बुलडाणा जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ‘सामाजिक ऐक्य परिषद’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. धार्मिक सण, उत्सव आणि महत्वाच्या प्रसंगी सामाजिक ऐक्य परिषद आणि शांतता समिती सभांमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच सामाजिक सौहार्द राखण्यासाठी मदत मिळाली.

 येथे झाली ‘सामाजिक ऐक्य परिषद’!

बुलडाणा जिल्ह्यात जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी गणेशोत्सव, विविध धार्मिक सुणासुदीच्या काळात तसेच महत्वाच्याप्रसंगी सामजिक ऐक्य परिषद आयोजित करण्यात येतात. सर्व जाती धर्माच्या धर्मगुरूंचे एकाचवेळी प्रबोधन ठेवण्यात येते. मानवतेचा दृष्टीकोन हे धर्मगुरू समाजासमोर मांडतात. सामाजिक एकतेचे महत्व पटविणाºया सामाजिक ऐक्य परिषदा घाटाखालील खामगाव, शेगाव, नांदुरा, वडनेर भोलजी, जळगाव जामोद, जामोद, पिंपळगाव राजा, मलकापूर, माटरगाव तर घाटावरील बुलडाणा, चिखली, मेहकर, साखरखेर्डा, देऊळगाव राजा, दुसरबीड, बोराखेडी, धाड, मेहकर येथे घेण्यात आल्या.

 शांतता समिती सभांनाही सकारात्मक यश!‘सामाजिक ऐक्य परिषद’ या अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांसोबतच बुलडाणा जिल्हा पोलिस दलाच्यावतीने बुलडाणा जिल्ह्यातील घाटाखाली आणि घाटावरील विविध विभागात शांतता समितीच्या बैठका सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येतात. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात १८ शांतता समितीच्या सभा आयोजित करण्यात आल्या. या बैठकांना विविध ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. 

 बुलडाणा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक गोष्ट कायद्याने सुधारू शकत नाही. अनेक ठिकाणी मानवीय दृष्टीकोन कामी येतो. समाजात सामाजिक ऐक्याची भावना निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत.- डॉ. दिलीप पाटील भुजबळजिल्हा पोलिस अधिक्षक, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSocialसामाजिकkhamgaonखामगाव