शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana: पोलिसांच्या सतर्कतेने बळावला त्याच्यावरील विश्वास! सहा लाखांच्या लुटमारीनंतर घेतला जात होता संशय

By अनिल गवई | Updated: March 21, 2023 16:42 IST

Buldhana: पोलीसांच्या सतर्कतेने खामगाव शहरातील अडत दुकानातील सामान्य कामगारावरील विश्वास दृढ होण्यास मदत झाली आहे. गांधी चौकात गाडीच्या िडक्कीतून सहा लाख रूपये लंपास झाल्यानंतर पोलीसांसह काहीजणांकडून त्याच्यावर संशय घेतल्या जात होता

- अनिल गवई

खामगाव - पोलीसांच्या सतर्कतेने खामगाव शहरातील अडत दुकानातील सामान्य कामगारावरील विश्वास दृढ होण्यास मदत झाली आहे. गांधी चौकात गाडीच्या िडक्कीतून सहा लाख रूपये लंपास झाल्यानंतर पोलीसांसह काहीजणांकडून त्याच्यावर संशय घेतल्या जात होता. परंतु, आता पोलीसांच्या सतर्कतेमुळे आरोपींची टोळी जेरबंद झाली.त्यामुळे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे डीक्कीतून पसै चोरी गेलेल्या सामान्य कामगाराचा जीव भांड्यात पडला आहे.

खामगाव शहरातील गांधी चौकातून १६ मार्च रोजी प्रमोद मोठे या कामगाराच्या दुचाकीच्या डिक्कीतून ६ लाखांची बॅग लंपास करण्यात आली. दरम्यान, रविवारी स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथकाने जीजे-१, डीए-६८८२ या आलीशान कारसह अजयकुमार अशोकभाई तमचे (४२), जिग्नेश दिनेश घासी (४४), रितीक प्रवीण बारंगे (२३) सर्व रा.अहमदनगर गुजरात या टोळीला पकडले. यात सात जण पॐरार होण्यात यशस्वी झाले. दरम्यान, टोळीतील सदस्यांनी खामगाव येथील सहा लाखांच्या बँगेची चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलीसांच्या या प्रयत्नामुळे कामगारावरील विश्वासही दृढ होण्यास मदत झाली आहे.आठ वर्षात पहिल्यांदाच घडली घटनाखामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडते श्याम बजरंग गायकवाड यांच्याकडे प्रमोद मोठे हा आठवर्षांपासून व्यवहार सांभाळतो. घटनेच्या दिवशी नास्ता करण्यासाठी गाडी उभी केली असता साडेसहा लाख रूपयांच्या बॅग दुचाकीच्या डीक्कीतून लंपास झाली. या घटनेमुळे प्रमोद संशयाच्या घेर्यात सापडला. पोलीसांनीही त्याची उलट तपासणी सुरू केली. त्यावेळी गायकवाड यांनी त्याच्यावर विश्वास दाखविला. परंतु काहींनी त्याच्याकडे अंगुली निदेर्श करीत त्याला कटात सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला. मात्र, सत्य हे सत्य या म्हणीचा प्रत्यय देत, प्रमोद मोठे प्रत्येक कसोटीवर खरा उतरला. आता पोलीसांनी चोरट्यांचा छडा लावला आहे. त्यामुळे प्रमाेद निष्पाप ठरण्यास पोलीसांची कृतीशीलता कारणीभूत ठरल्याची चचार् आहे.अडत दुकानातील रक्कम बँकेतून बाजारात घेऊन जात असताना गांधी चौकातून लंपास झाली होती. पोलीसांच्या सतर्कतेमुळे आरोपी पकडल्या गेल्याचे समाधान आहे.- प्रमोद मोठेखामगाव.

 पोलीसांच्या प्रयत्नामुळे चोरी गेलेल्या रक्कमेचा छडा लागला. पोलीसांचे सुरूवातीपासूनच सकारात्मक सहकार्य मिळाले. चाेरट्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आता रक्कम लवकर परत मिळावी, ही अपेक्षा आहे.- श्याम गायकवाडअडत व्यापारी, खामगाव

टॅग्स :Policeपोलिसbuldhanaबुलडाणा