शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘होळी’चा बेरंग करणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 14:40 IST

दारू पिऊन वाहन चालविणाºयांविरोधात कारवाईसाठी शहर पोलिसांनी मोहिम उघडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:होळी आणि धुळवडीला दारू पिऊन वाहन चालविणाºया वाहन चालकांवर कारवाईसाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. दारू पिऊन वाहन चालविणाºयांवर पोलिसांची करडी नजर असून, सोमवारी दुपारपासूनच शहर पोलिसांनी अनेकांची तपासणी सुरू केली आहे.होळी आणि धुलीवंदनाला दारू पिऊन वाहन चालविणे आणि इतर गोष्टी करण्याचे फॅड युवक आणि काही सामान्यांमध्ये दिसून येते. दारू पिऊन अथवा धांगडधिंगा करीत वाहने चालविल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होते. शिवाय अनेक निष्पापांचा नाहक जीव जातो. त्यामुळे होळी आणि धुळवडीला धांगडधिगा तसेच दारू पिऊन वाहन चालविणाºयांविरोधात कारवाईसाठी शहर पोलिसांनी मोहिम उघडली आहे.

 ‘ब्रिथ’ अ‍ॅनालायझरद्वारे तपासणी!शहरातील मुख्य रस्ते आणि  विविध चौकांमध्ये पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. याठिकाणी ‘ब्रिथ’अ‍ॅनालायझरद्वारे तपासणी केली जाणार आहे. दारू पिऊन वाहन चालविताना आढळून आल्यास तात्काळ गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तसेच बंदोबस्तासाठी स्ट्रायकिंग फोर्स आणि आरसीपी पथक तैनात करण्यात आले आहे. खबरदारी घेण्याचे आवाहन!‘कोरोना’ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी होळी आणि धुलीवंदन साजरे करताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धुलीवंदनासाठी ओल्या रंगांऐवजी कोरड्या रंगांचा वापर करण्याचेही पोलिसांनी सुचविले आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर आपल्या हातून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याचीही खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 होळी आणि धुलीवंदन हा सण करताना नागरिकांनी शांततेने आणि उत्साहात साजरा करावा. शहरातील शांततेला बांधा पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी. दारू पिऊन वाहन चालविणाºयांविरोधात तसेच धांगडधिंगा करणाºयाविरोधात मोहिम उघडण्यात आली आहे.- सुनील अंबुलकरनिरिक्षकशहर पोलिस स्टेशन, खामगाव. 

टॅग्स :khamgaonखामगावPoliceपोलिसHoliहोळीDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्ह