शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात मोहफुलांच्या गोदामावर छापा; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 18:06 IST

 मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी टिळक पुतळ्यामागील परिसरातील गोदामावर धडक दिली.

खामगाव: लॉकडाऊन काळात दारू विक्री बंद असल्याची संधी साधत गावठी दारूची विक्री वाढविण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या अवैध धंद्याना शहर पोलिसांनी सोमवारी सुरूंग लावला. गावठी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणाºया दोन मोहफुलांच्या गोदामावर पोलिसांनी सिनेस्टाईल छापा टाकला. या कारवाईत १६ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाच जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी टिळक पुतळ्यामागील परिसरातील गोदामावर धडक दिली. त्यावेळी दोन ठिकाणी मोहफुले, दारू विक्रीसाठी लागणारे २७३ नग टिनाचे डबे आणि इतर साहित्याची विक्री होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संचारबंदीचे उल्लघंन तसेच मास्क आणि इतर साहित्याचा वापर न करताच गुप्ता यांच्या गोदामावर मोहफुलांची गर्दीकरून विक्री सुरू होती. पोलिस आल्याचे समजताच काहींनी घटनास्थळावरून पळ काढला.  दरम्यान, या कारवाईत ६४० पोते मोहफुले किंमत १५ लाख ३६ हजार रुपये , २ मोटार सायकली, २७३ नग टिनडबे, इलेक्ट्रानिक तराजू असा एकुण १६ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गोदामाला सील ठोकले. याप्रकरणी ब्रिजमोहन होशीयारमल गुप्ता, बिपीन सुमेरचंद गुप्ता दोघेही रा.खामगाव, विकास सूर्यभान इंगळे रा. धामनगाव देशमुख ता. मोताळा, सचिन महादेव इंगळे रा. हिंगणा कारेगाव, विजय नागोराव जाधव रा. गारडगाव यांच्या विरोधात महाराष्ट्र दारू बंदी कायदा कलम ६५, ६९ भादंवि कलम १८८, २६९, २७०, २७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अप्पर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक सुनिल अंबुलकर यांच्या पथकातील पीएसआय सराग, हे.कॉ. वाघमारे, कोळे, गजानन जोशी, पोकॉ. बंटी बडगे, सूरज राठोड, राजपूत, संदीप टाकसाळ, हिवाळे, इंगळे, जाधव यांनी ही कारवाई केली.

 गुप्त माहितीच्या आधारे दोन ठिकाणी मोह फुलांची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. यामाहितीच्या आधारे दोन्ही ठिकाणी छापा टाकण्यात आला. त्यावेळी काही जण पसार झाले. यापैकी ५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.- सुनिल अंबुलकरशहर पोलिस निरिक्षक,खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस