फार्महाऊसमधील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ११ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 11:42 AM2021-03-08T11:42:32+5:302021-03-08T11:43:36+5:30

Police raid on gambling in farmhouse पाच दुचाकीसह एकूण दोन लाख ७४ हजार सातशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Police raid gambling den in farmhouse; 11 arrested | फार्महाऊसमधील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ११ जणांना अटक

फार्महाऊसमधील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ११ जणांना अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : ग्रामीण पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत येणाऱ्या शिरजगाव निळे येथील शेतामध्ये फार्महाऊसवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बुलडाणा  स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने छापा मारून पाच दुचाकीसह एकूण दोन लाख ७४ हजार सातशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी ११ आरोपींना अटक करण्यात आली.  बारावा आरोपी शेतमालक फरार झाला. 
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार  शेगाव खामगाव रोडवरील शिरजगाव निळे शिवारात सुरेश उर्फ अण्णा नागेश्वर रा. गांधी चौक, बारादरी, खामगाव याच्या मालकीच्या फार्महाऊसवर तीनपत्ती जुगार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली.  त्यानुसार ६ मार्च रोजी संध्याकाळी छापा टाकण्यात आला.  यावेळी नगदी ५३ हजार सातशे वीस रुपये, अकरा नग मोबाईल किंमत ४० हजार ९०० रुपये, पाच मोटरसायकल  किंमत एक लाख ८० हजार रुपये व इतर जुगाराचे साहित्य असा एकूण दोन लाख ७४ हजार सातशे वीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.  याबाबतची फिर्याद सरकारतर्फे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल  गजानन दामोदर यांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली. त्यावरून खामगावातील आरोपी घनश्याम माणिकलाल भुतडा (४९)  रा. जलालपुरा,  आजम खान अब्दुल रहमान खान, रा. माखणी, नसिरुद्दीन अनिसउद्दीन रा. फाटकपुरा,  शेख इसाक शेख गुलाब रा.  जुना फैल,  पुरुषोत्तम केदारमल टिबडेवाल,  रा. गांधी चौक शेगाव, पुरुषोत्तम जगन्नाथ राठी रा.  केदार नगर खामगाव,  हिंमत भगवान रोजीया, रा.  राठी प्लॉट खामगाव,  संतोष चंद्रभान नागरगोजे, चांदमारी खामगाव, गणेश नारायण मुधळकर रा. रेखा प्लॉट खामगाव,  किसन दगडू माळोदे, रा. गजानन नगर खामगाव,  गजानन सुखदेव सोनोनेे,  रा. शंकर नगर खामगाव,  सुरेश उर्फ अण्णा नागेश्वर गांधी चौक बारादरी अशा बारा जणांविरुद्ध  महाराष्ट्र जुगार कायद्यासह  भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.  बारा आरोपींपैकी जागा मालक असलेला सुरेश उर्फ अण्णा नागेश्वर हा आरोपी फरार आहे.  ११ आरोपींना अटक करण्यात आली.  अधिक तपास शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पो.हे.काँ ज्ञानदेव ठाकरे करीत आहेत.

Web Title: Police raid gambling den in farmhouse; 11 arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.