शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पुरोहितसह मुलीच्या माता, पित्यांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 01:21 IST

गर्भपातादरम्यान अल्पवयीन मुलीच्या १८ डिसेंबर रोजी झालेल्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या डॉ. सुभाष पुरोहित आणि मृत मुलीचे आई- वडील अनुक्रमे लता भोसले, पन्नाशा भोसले यांना मंगळवारी न्यायालयाने  २७  नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलीचा गर्भपातादरम्यान मृत्यू२0 आठवड्यांची होती गर्भवती

लोकमत न्यूज नेटवर्क लोणार: गर्भपातादरम्यान अल्पवयीन मुलीच्या १८ डिसेंबर रोजी झालेल्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या डॉ. सुभाष पुरोहित आणि मृत मुलीचे आई- वडील अनुक्रमे लता भोसले, पन्नाशा भोसले यांना मंगळवारी न्यायालयाने  २७  नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी या प्रकरणात पोलिसांनी प्रारंभी आकसमिक मृत्यूची नोंद केली होती; मात्र  शवविच्छेदनादरम्यान अल्पवयीन मुलगी ही २0 आठवड्यांची गर्भवती असल्याचे  समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणाला कलाटणी मिळाली. त्यानंतर अवैधरीत्या  गर्भपात केल्याप्रकरणी डॉ. सुभाष पुरोहित, मृत मुलीचे वडील पन्नाशा भोसले आणि  आई लता भोसले यांना सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली होती.  दरम्यान, या अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणारा आरोपी मात्र अद्यापही मोकाटच  आहे.दुसरीकडे अल्पवयीन असल्याने तथा गर्भपातादरम्यान मोठय़ा प्रमाणावर रक्तस्त्राव  झाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप  भटकर, डॉ. राजश्री बनसोडे, स्रीरोग तज्ज्ञ डॉ. लोणकर मृत मुलीचे शवविच्छेदन  केले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता पाटील यांनी अख्खा एक दिवस  आणि रात्र या प्रकरणात बारकाईने लोणारात चौकशी व पाहणी केली होती. त्यानंतर  वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप भटकर यांच्या तक्रारीवरून साईकृपा क्लिनिक सील  करण्यात आले होते.  पोलीस निरीक्षक राजेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस  उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर थोरात, पोलीस उपनिरीक्षक उकंडराव राठोड, पोलीस  हेडकॉन्स्टेबल गजानन तायडे, गुलाब झोटे, चंद्रशेखर मुरडकर, प्रदीप सोनुने, शेखर  थोरात, कैलास चतरकर, रवीद्र बोरे, संतोष चव्हाण तपास करीत आहेत. 

२0 आठवड्यांची होती गर्भवतीमृत झालेली अल्पवयीन मुली २0 आठवड्यांची गर्भवती होती. शवविच्छेदन  अहवालादरम्यान हा प्रकार समोर आला. १८ नोव्हेंबरला तिला साईकृपा  िक्लनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे गर्भपात करताना तिचा मृत्यू झाला  होता. त्यानंतर गोंधळ झाल्याने या संपूर्ण प्रकरणाचे बिंग फुटले होते.