‘त्या’ अल्पवयीन मुलीचा गर्भपातादरम्यान मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:01 AM2017-11-21T00:01:42+5:302017-11-21T00:13:32+5:30

लोणार : दोन  दिवसापूर्वी शहरातील एका क्लिनीकमध्ये अल्पवयीन मुलीच्या  झालेल्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी मुलीची ६0 वर्षीय आई लताबाई पन्नाशा भोसले  आणि डॉ. सुभाष पुरोहित यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना २0 नोव्हेंबर रोजी अटक केली.

'That little girl dies during miscarriage!' | ‘त्या’ अल्पवयीन मुलीचा गर्भपातादरम्यान मृत्यू!

‘त्या’ अल्पवयीन मुलीचा गर्भपातादरम्यान मृत्यू!

googlenewsNext
ठळक मुद्देमुलीचया आईसह डॉक्टरला अटकजिल्हा शल्यचिकित्सकांनी केली ‘साईकृपा क्लिनीक’ची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : दोन  दिवसापूर्वी शहरातील एका क्लिनीकमध्ये अल्पवयीन मुलीच्या  झालेल्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी मुलीची ६0 वर्षीय आई लताबाई पन्नाशा भोसले  आणि डॉ. सुभाष पुरोहित यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना २0 नोव्हेंबर रोजी  अटक केली. गर्भपातादरम्यान, या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याचे जिल्हा  शल्यचिकित्सक यांनी लोणार येथील या क्लिनीकची पाहणी केली असता समोर  आले आहे.
तालुक्यातील आरडव येथील अल्पवयीन मुलीचा डॉ. सुभाष पुरोहित यांच्या साई  िक्लनिकमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी  अंदाजे साडेसहाच्या  दरम्यान घडली होती. साई क्लिनिकमध्ये डॉ. सुभाष पुरोहित  या मुलीवर उपचार करीत असताना वडील पन्नाशा भोसले व लता भोसले मुलीच्या  सोबत होते. दरम्यान मुलीचा मृत्यू झाल्यामुळे त्यावेळी गोंधळ झाला होता.  पोलिसांना याची माहिती मिळताच त्यानुषंगाने तपास सुरू करण्यात आला होता. मृत  मुलीचे १९ नोव्हेंबरला लोणार ग्रामीण रुग्णालयात १९ नोव्हेंबर रोजी डॉ. राजश्री  बनसोडे, डॉ. भटकळ व अन्य डॉक्टरांनी शवविच्छेदन केले होते. 
प्रकरणी आरडव येथील लता भोसले यांच्या तक्रारीवरून प्रारंभी लोणार पोलिस  ठाण्यात र्मग दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक  राजेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उकंडराव राठोड, राम गी ते, चंद्रशेखर मुरडकर करीत आहेत. 
प्रसारमाध्यमामध्ये यासंदर्भात वृत्त प्रकाशीत झाल्यानंतर त्याची दखल घेत जिल्हा  शल्यचिकित्सक डॉ. सरिता पाटील यांनी साई क्लिनिकची तपासणी केली असता  डॉ. सुभाष पुरोहित यांनी त्या १५ वर्षीय मुलीचा गर्भपात केल्याचे त्यांच्या तपासात  समोर आले. त्यामुळे याप्रकरणाताल वेगळे वळण लागले आहे.
यासंदर्भात लोणार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन  मुलीची आई लताबाई पन्नाशा भोसले आणि साई क्लिनीकचे डॉ. सुभाष पुरोहीत  यांना पोलिसांनी २0 नोव्हेंबरा रात्री उशिरा अटक केली. या प्रकरणात अल्पवयीन  मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तथा बाल लैंगिक अपराधापासून  संरक्षण अधिनियम २0१२ सह वैद्यकीय गर्भपात सुधारीत कायदा २00२ सह अन्य  कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्लिनिक सील
महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनल अँक्ट ३७ नुसार डॉ. सुभाष पुरोहीत यांच्यावर गुन्हा  दाखल करून त्यांचे क्लिनीक सील करण्यात आले आहे. लोणार वैद्यकीय  अधिकारी डॉ. संदीप भटकळ यांच्या तक्रारीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल झाला.
-
 

Web Title: 'That little girl dies during miscarriage!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.