शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात पोळा सण उत्साहात साजरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 20:07 IST

खामगाव येथील फरशी भागात रविवारी वृषभ राजाचा सण पोळा उत्साहात साजरा करण्यात आला.

खामगाव - येथील फरशी भागात रविवारी वृषभ राजाचा सण पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. अल्प पाऊस,  पीक परिस्थतीही फारशी समाधानकारक नसताना शेतक-यांनी शेतात राब-राब राबणारा तसेच आपला खराखुरा सोबती असलेल्या वृषभराजाचा पोळा सण उत्साहात साजरा केला. खामगाव शहरात दरवर्षीप्रमाणे फरशी येथे पोळा भरला.शहरातील शेतकरी आपल्या बैलांना सजवून फरशी येथे पोळ्यात घेऊन आले. येथे शिवाजीराव देशमुख व देवेंद्र देशमुख यांच्या हस्ते सर्वप्रथम मानाची बैलाची पूजा करण्यात आली. देशमुख वाड्यामधील परंपरागत गुढी तसेच इतरही मानाच्या गुढ्या फरशी येथे आणण्यात आल्या होत्या. फरशी येथे तोरण बांधण्यात आले होते. बैलाची पुजा अर्चा करून ठोंबरा वाटून तोरण तोडून पोळा फोडण्यात आला. विविध रंगबेरंगी झुला सजवून अनेक शेतक-यांनी बैलांच्या शिंगांना आकर्षक रंग देवून अंगावर झुला टाकुन शिवाजीनगर पोलीस स्टेशनजवळ बैलांचा पोळा भरला होता. आकर्षक रंगांनी सजवून नटलेल्या वृषभराजास मोठ्या थाटामाटात शेतकºयांनी पोळ्यात आणले होते. शहरातील दाळफैल, सुटाळपुरा, गोपाळ नगर, यासह शिवाजीनगर सतीफैल भागातील शेतक-यांनी आपले बैल वाजत गाजत फरशीवरील पोळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आणले होते. 

बॉक्स........ पोळा कोरडाच गेला, वरुण राजाचा अभिषेक नाहीखामगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली आहे. निदान पोळ्याच्या दिवशी वृषभराजावर वरूणराजाचा अभिषेक होईल, अशी आशा शेतक-यांना होती. मात्र ऐन पोळ्याचा दिवसही कोरडाच गेला.   

 बैलांचे स्नान घरीच बैल पोळ्यात नेण्याआधी सकाळी शेतकरी बांधव  बैलांना आंघोळ घालतात अर्थात बैल धुतात. आजुबाजुला असलेल्या नदी-नाल्यात वाहत्या पाण्यात बैल धुण्याची मजा काही औरच असते. परंतु यावर्षी खामगाव  परिसरात अद्याप एकाही नदीला तसेच नाल्याला पूर गेला नाही. त्यामुळे  शेतक-यांना बकेटमध्ये पाणी घेवूनच बैलांना आंघोळ घालावी लागली.

टॅग्स :newsबातम्याcultureसांस्कृतिकbuldhanaबुलडाणा