शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सुतगिरणीतील गैरव्यवहाराबाबत ‘आप’ संघटनेकडून जनहित याचिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 20:55 IST

हुतात्मा वीर जगदेवराव सहकारी सूत गिरणीतील गैरव्यवहाराबाबत शेअरधारकासह ‘आप’ संघटनेचे जिल्हा संयोजक डॉ. नितीन नांदुरकर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहितयाचिका दाखल केली आहे. 

खामगाव : हुतात्मा वीर जगदेवराव सहकारी सूत गिरणीतील गैरव्यवहाराबाबत शेअरधारकासह ‘आप’ संघटनेचे जिल्हा संयोजक डॉ. नितीन नांदुरकर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहितयाचिका दाखल केली आहे. मलकापूर, नांदुरा, व मोताळा तालुक्याअंतर्गत येणारी हुतात्मा वीर जगदेवराव सहकारी सूत गिरणी ही मागील काही वर्षापासून वादाच्या भोवºयात सापडली आहे. कामगारांचे थकीत वेतन, निवृत्त कर्मचाºयांना न मिळालेला लाभ, गिरणीतील मशिनींची नियमबाह्य विक्री, हिना ट्रेडिंग कंपनीसोबत झालेला गैरव्यवहार, हायवेमध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला प्रकरण, माजी संचालकांकडून झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, निवडणूकीदरम्यान झालेली न्यायालयीन लढाई अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. शेतकºयांच्या हितासाठी सुरु झालेली ही सूतगिरणी आज अत्यंत बिकट परिस्थितीत आहे. या सर्व प्रकाराची शासनामार्फत अनेकदा चौकशीही करण्यात आली. परंतू त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे या सूत गिरणीमध्ये आजपर्यंत झालेल्या गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी होवून दोषींवर कारवाई होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहितयाचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका सूतगिरणीचे शेअरधारक रामराव काशिराम कळसकार (रा. तिकोडी), आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक डॉ. नितीन वसंतराव नांदुरकर (रा. नांदुरा), विर जगदेवराव यांचे चरित्र लेखक मुकूंद विश्वनाथ चोपडे (रा. कोळंबा) यांनी दाखल केली आहे. यामध्ये प्रतिवादी म्हणून वस्त्रोद्योग मंत्रालयाचे सचिव, संचालक सहकारी संस्था व वस्त्रोद्योग नागपूर, जिल्हा निबंधक सहकारी संस्था, सूतगिरणीचे अध्यक्ष तसेच सुनिता पांडे (विशेष लेखाकार सहकारी संस्था, सुतगिरणी) अमरावती यांचा समावेश आहे. या जनहित याचिकेवर १० सप्टेंबररोजी सुनावणी झाली. त्यात सूतगिरणीला कोणत्याही प्रकारचे अनुदान न देण्याचे राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिले असून सर्व प्रतिवादींना नोटीस सुद्धा बजावण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. मुकेश समर्थ व पवन राहूलकर यांनी बाजू मांडली. या जनहित याचिकेची सुनावणी २९ आॅक्टोबर रोजी होणार आहे. याच दिवशी माजी संचालक भोजराज शेलकर यांनी दाखल केलेल्या रिट पिटीशन नं. ११६६ वर सुद्धा सुनावणी होईल. 

न्याय मिळेपर्यंत लढा सुरुच ठेवणारसूतगिरणी बंद पडल्याने हजारो कामगारांसमोर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी, शेअरधारकांना न्याय मिळवून देईपर्यंत आप संघटना स्वस्थ बसणार नाही. आमचा लढा सुरुच ठेवू. डॉ. नितीन नांदुरकर, जिल्हा संयोजक, आम आदमी पार्टी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणा