शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

धनादेश अनादरप्रकरणी एकास दहा लाखाचा दंड! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:05 IST

मलकापूर : चेक अनादरीत झाल्याच्या प्रकरणात आरोपीस दहा लाख रुपये दंड तसेच फिर्यादीस नुकसान भरपाई म्हणून हे दहा लाख रुपये संबंधितास देण्याचा आदेश ९ एप्रिल २0१८ रोजी विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायाधीश वसंत एस. यादव मलकापूर यांनी दिला आहे.

ठळक मुद्देप्रथम श्रेणी न्यायाधीश मलकापूर यांनी दिला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : चेक अनादरीत झाल्याच्या प्रकरणात आरोपीस दहा लाख रुपये दंड तसेच फिर्यादीस नुकसान भरपाई म्हणून हे दहा लाख रुपये संबंधितास देण्याचा आदेश ९ एप्रिल २0१८ रोजी विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायाधीश वसंत एस. यादव मलकापूर यांनी दिला आहे.यमुना ट्रेडर्स ही एक भागिदारी संस्था असून, सदरचे भागिदारी संस्थेचे भागिदार/पार्टनर १ संजय पंचालाल चांडक पार्टनर २ विकम विजयकुमार चांडक हे दोघे भागिदार आहेत. त्यांनी फिर्यादी बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी र्मया. बुलडाणा (मल्टी स्टेट) शाखा मलकापूर यांच्याकडून कॅश क्रेडीट कर्ज रक्कम ८0 लाख रुपये घेतले होते. त्या कर्जाची थकीत रकमेचा अंशत: भरणा करण्यासाठी यमुना ट्रेडर्सतर्फे  भागिदार/पार्टनर नं. १ संजय चंपालाल चांडक पार्टनर २ विकम विजयकुमार चांडक यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मलकापूर खात्यात दहा लाख रुपयांचा चेक फिर्यादी संस्थेस दिला होता. दिलेला चेक बँकेत वटविण्यास जमा केला असता खात्यामध्ये पुरेशी रक्कम जमा नसल्याने अनादरीत होऊन परत आल्याने बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी र्मया. बुलडाणा (मल्टीस्टेट) शाखा मलकापूर यांनी नोटीस देऊन पंधरा दिवसात चेकची रक्कम देण्याची मागणी करूनदेखील यमुना ट्रेडर्सतर्फे भागिदार/पार्टनर नं. १ संजय चंपालाल चांडक पार्टनर २ विकम विजयकुमार चांडक यांनी दिलेल्या मुदतीत रक्कम भरणा केली नाही म्हणून बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी र्मया. बुलडाणा (मल्टीस्टेट) शाखा मलकापूर यांनी विद्यमान न्यायालयात निगोशिएबल इन्स्टुमेंट अँक्टचे कलम १३८ नुसार फिर्याद फौ.मु.नं. २९२/२0१५ ही दाखल केली होती. अंतिम सुनावणी होऊन फिर्यादीतर्फे विवेक मा. बापट अँडव्होकेट यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपीस दहा लाख रुपये दंड तसेच कोर्ट उठेपर्यंत सजा आणि सदरची रक्कम फिर्यादीस नुकसान भरपाई दाखल देण्याचा आदेश दिला. 

टॅग्स :MalkapurमलकापूरCourtन्यायालय