शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

लोक अदालतीत ७ लाख १० हजाराचा थकीत कराचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 12:05 IST

लोकअदालतमध्ये थकीत कराचा भरणा करण्यासाठी कर खातेदार सरसावले आणि चक्क ७ लाख १० हजाराची वसुली झाली.

ठळक मुद्देराष्ट्रीय लोकअदालत राज्यात प्रथमच बुलडाणा जिल्ह्यात शनिवारी तालुकास्तरावर आयोजित करण्यात आली होती. थकीत कराचा भरणा करण्यासाठी थकीत करधारकांची मोठी उपस्थिती दिसून आली. करधारकांनी चक्क ७ लाख १० हजाराचा थकीत कराचा भरणा करून काही प्रकरणे नस्ती निघाली. 

- नानासाहेब कांडलकरलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद :  थकीत मालमत्ता व पाणीकराच्या वसुलीसाठी राष्ट्रीय लोकअदालतचा प्रयोग राबविण्यात आला. यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीमधील १२ हजार थकीत कराची प्रकरणे पंचायत विभागाने दाखल केली होती. शनिवार ८ रोजी झालेल्या लोकअदालतमध्ये थकीत कराचा भरणा करण्यासाठी कर खातेदार सरसावले आणि चक्क ७ लाख १० हजाराची वसुली झाली.राष्ट्रीय लोकअदालत राज्यात प्रथमच बुलडाणा जिल्ह्यात शनिवारी तालुकास्तरावर आयोजित करण्यात आली होती. या लोकअदालतमध्ये प्रकरण आपसात मिटविण्यासाठी मालमत्ता व पाणी कर थकीत असलेले कर खातेदार कराच्या भरणा करण्यासाठी सरसावले असल्याचे दृष्य पहावयास मिळाले. थकीत मालमत्ता व पाणी कर वसुलीअभावी अनेक गावांचा विकास खोळंबलेला दिसून येतो. पंचायत समितीच्या अंतर्गत ग्रामपंचायती मार्फत थकीत कर धारकांसाठी गावात दवंडी देवून नोटीस पाठविली जाते. परंतु थकीत करधारकांकडून पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने काही ग्रामंपचायतींची मालमत्ता व पाणी कराची वसुली ही ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. यावर उपाय म्हणून राष्ट्रीय लोकअदालतीचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. जळगाव जामोद पंचायत विभागाच्यावतीने यामध्ये १२ हजार प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यामुळे शनिवारी जळगाव न्यायालयाच्या परिसरात तडजोडीतून थकीत कराचा भरणा करण्यासाठी थकीत करधारकांची मोठी उपस्थिती दिसून आली.  करधारकांनी चक्क ७ लाख १० हजाराचा थकीत कराचा भरणा करून काही प्रकरणे नस्ती निघाली. सदर राष्ट्रीय लोकअदालतकरीता १४  पॅनल व २ पंच नियुक्त करण्यात आले होते. त्यावर अ‍ॅड.मारोडे, अ‍ॅड.काकडे, अ‍ॅड.चांडक, अ‍ॅड.राजपूत, अ‍ॅड.वाघ, अ‍ॅड. वानखडे, अ‍ॅड.खेर्डेकर, अ‍ॅड.इंगळे, उंबरकर, अ‍ॅड.मोहम्मद इरफान, अ‍ॅड.शाकीर, अ‍ॅड.मोहसीन, अ‍ॅड.पांडे, मुंडोकार, मनसुटे यांनी काम पाहिले. तसेच या अदालतीच्या यशस्वीतेसाठी एपीआय चव्हाण, न्यायालयीन कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मोलाची कामगिरी बजावली.

लोकअदालतीमध्ये ७३४ प्रकरणांचा निपटाराराष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण  नवी दिल्ली, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलडाणा यांच्या आदेशान्वये जळगाव जामोद तालुका विधी सेवा समितीच्यावतीने दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दिवाणी व फौजदारी यांची ९ प्रकरणांचा तसेच दाखलपूर्व ७२५ अशा एकुण ७३४ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. आपसात तडजोडीने निकाली निघालेल्या प्रकरणांमध्ये १७ लाख २४ हजार २५४ रूपयांची वसुली करण्यात आली. यावेळी तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्ष न्यायाधीश बी.एस. पाल, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.एस.एस. वानखडे यांचेसह वकील संघाचे सदस्य, बँकांचे शाखा व्यवस्थापक, ग्रामसेवक, पंचायत विस्तार अधिकारी संदीप मोरे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalgaon Jamodजळगाव जामोदCourtन्यायालय