शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पैनगंगा नदीला पुर; बुलडाणा-चिखली मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 11:08 IST

बुलडाणा शहरानजीकच्या पैनगंगा नदीला पुर आल्यामुळे बुलडाणा-चिखली मार्ग सोमवारी सकाळ पासून बंद आहे.

बुलडाणा: परतीच्या पावसाचे वेध लागलेले असतानाच बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवसापासून पुन्हा दमदार पावसाने हजेरी लावली असून २० सप्टेंबर रोजी रात्री पडलेल्या पावसामुळे सिंदखेड राजासह संग्रामपूर तालुक्यात नुकसान झाले असल्याची माहिती आहे. दरम्यान बुलडाणा शहरानजीकच्या पैनगंगा नदीला पुर आल्यामुळे बुलडाणा-चिखली मार्ग सोमवारी सकाळ पासून बंद आहे. वृत्त लिहीपर्यंत हा मार्ग सुरू झाला नव्हता.दुसरीकडे सोमवारी सकाली आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी २९.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक पाऊस हा सिंदखेड राजा तालुक्यात झाला असून ७० मिमी एवढी या पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल संग्रामपूर तालुक्यात ५५ मिमी, मेगर तालुक्यात ४२ मिमी, बुलडाणा तालुक्यात २७, चिखली तालुक्यात २०, देऊळगाव राजा २०, लोणार ३३, नांदुरा २७, मलकापूर २१ मिमी या प्रमाणे पाऊस झाला आहे.या दमदार पावसामुळे पैनगंगा नदीला पुर आला असून बुलडाणा शहरानजीक येळगाव येथील पुल पाण्याखाली गेल्याने सोमवारी सकाळपासून हा मार्ग बंद आहे. सकाळी दहा वाजेच्या सुमारास पुराचे पाणी वाढल्याने हा पुल पाण्याखाली गेल्याचे सांगण्यात येत आहे. दुपार पर्यंत पुराचे पाणी उतरल्यास बुलडाणा-चिखली मार्ग पुर्ववत सुरू होवू शकतो.

दोन तालुक्यांनी वार्षिक सरासरी ओलांडलीसध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्याची वार्षिक सरासरी ही ८८ टक्क्यावर पोहोचली असून दोन तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. यामध्ये सिंदखेड राजा तालुक्यात वार्षिक सरारीच्या १०२ मिमी तर मलकापूर तालुक्यात १०४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. संग्रामपूर तालुक्याची सरासरी ९९ टक्क्यावर तर चिखली तालुक्याची सरासरी ही ९८ टक्क्यांवर पोहोचली आहे. येत्या दोन दिवसात असाच पाऊस पडत राहिल्यास १३ तालुक्यांपैकी आठ तालुके पावसाची वार्षिक सरासरी ओलांडू शकतात.

टॅग्स :buldhanaबुलडाणाChikhliचिखलीfloodपूर