ब्रम्हानंद जाधवउगमस्थान दुर्लक्षीत : उगमस्थानाची साक्ष देणा-या वास्तूला लोखंडी खांबाचा आधारबुलडाणा : अजिंठा पर्वतरांगेच्या कुशीत असलेल्या पैनगंगा नदीचे उगमस्थानसध्या शेवटची घटका मोजत आहे. या नदीच्या उगमस्थानाची साक्ष देणारेहेमाडपंथी बुधनेश्वर मंदिराच्या ऐतिहासिक नक्षीकाम केलेल्या दगडीखांबाची पडझड झाली असल्यामुळे हे ऐतिहासिक मंदिर सध्या लोखंडी खांबाच्याआधारावर तग धरून आहे. नदीचे उगमस्थान ढासाळले असल्याने ऐतिहासिक वास्तूधोक्यात सापडली आहे.विदर्भाच्या नद्यांचा उल्लेख पौराणीक साहित्यामध्ये आलेला असून,त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातून वाहत असलेल्या पैनगंगा या नदीचाही विशेषउल्ल्ेख असल्याने पैनगंगा नदीला पौराणिक महत्व प्राप्त आहे. बुलडाणाजिल्ह्याच्या पश्चिम सिमेवरुन चिखली-बुलडाणा पठारात उगम पावनारी पैनगंगानंदी ४८० किमी वाहत जाऊन चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्गुस जवळ वर्धा नदीलामिळते. अजिंठा पर्वतरांगेत आग्नेय उतारावर पैनगंगा नदीचा उगम होतो.पैनगंगा ही नदी बुलडाणा व यवतमाळ पठारावरुन पूर्वेकडे वाहत जाते आणियवतमाळच्या पूर्व सरहद्दीवर बल्लारपूर येथे वर्धा नदीला पैनगंगा मिळते.पैनगंगा नदीही वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांच्या दक्षिण सीमा आहेत. पैनगंगानदीला उजव्या किनाऱ्याने कयाधू तर डाव्या किनाऱ्याने पूस, अडाण, आरणा,वाघाडी, खुनी या उपनद्या मिळतात. तसेच या नदीवर धरणे बांधून शेतीचाविकास झालेला आहे. देउळघाट, वणी, पुसद, पांढरकवडा, चिखली, मेहेकर ही शहरेपैनगंगा नदीच्या खोऱ्यात आहेत. मात्र, सध्या या पैनगंगा नदीचे उगमस्थानधोक्यात सापडले आहे. सर्वत्र नदी खोलीकरणाची मोहिम राबविण्यात येत असतानानदीच्या उगमस्थानाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. उगमस्थानाच्याठिकाणाहून दुरपर्यंत पैनगंगा नदीचे पात्र बुजत चालले आहे. या नदीपात्रावर काही ठिकाणी अतिक्रमणही झाले आहे. उगमस्थान जमीन दोस्त होतअसून, काही दिवसांनी या उगमस्थानाची ओळखही याठिकाणाहून पुसल्या जाण्याचीभिती व्यक्त होत आहे. उगमस्थानाची साक्ष देणाऱ्या मढ येथील हेमाडपंथीबुधनेश्वर मंदिराची दुरवस्था झाली आहे. या हेमाडपंथी मंदिराचे नक्षीदारदगडी खांब तुटल्याने ऐतिहासिक वास्तूवर अवकळा आल्याचे दिसून येते.नक्षीदार स्तंभ झाले भग्नपैनगंगा नदीच्या उगमस्थानावर इ.स.१६३९ साली स्थापन झालेले हेमाडपंथीबुधनेश्वर मंदिर हे अनेक छोट्या-छोट्या मुर्त्यां, नक्षीदार खांब, सुबककोरीव दगडांपासून बनवले होते. परंतू सध्या याठिकाणी असलेले अनेक नक्षीदारस्तंभ भग्न झालेले दिसून येतात. मंदिराच्या खांबावरील दगडी नक्षीकामकमालीचं देखणं आहे. मात्र मंदिराच्या या देखण्या खांबाची पडझड झाल्यानेअनेक खांब पैनगंगा नदीच्या उगमस्थानाच्या खोऱ्यात इतरत्र पडलेले दिसतात.
पर्वतरांगेच्या कुशीतील पैनगंगा नदीचे उगमस्थान धोक्यात!
By admin | Updated: May 20, 2017 13:34 IST