पालिका, जि.प.वर एकहाती सत्ता मिळविण्यासाठी कामाला लागा - जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:39 AM2021-09-05T04:39:05+5:302021-09-05T04:39:05+5:30

या वेळी आ. संजय गायकवाड, माजी आ. शशिकांत खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शांताराम दाणे, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, नरेंद्र ...

Palika, work to get one-sided power on ZP - Jadhav | पालिका, जि.प.वर एकहाती सत्ता मिळविण्यासाठी कामाला लागा - जाधव

पालिका, जि.प.वर एकहाती सत्ता मिळविण्यासाठी कामाला लागा - जाधव

Next

या वेळी आ. संजय गायकवाड, माजी आ. शशिकांत खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शांताराम दाणे, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, नरेंद्र खेडेकर, युवासेना जिल्हाधिकारी ऋषी जाधव, महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बढे व आशाताई झोरे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

खा. जाधव म्हणाले, ज्या पदावर आपण काम करत आहोत, त्या पदाच्या माध्यमातून आपण पक्षासाठी काय दिले याचे आत्मचिंतन करत पदाधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे. राज्यातील सत्ताबळाचा फायदा हा सर्वसामान्य नागरिकांची कामे करीत असताना कार्यकर्त्यांनादेखील त्यांच्या निवडणुकीमध्ये व्हावा यासाठी जाणीवपूर्वक प्रत्येकाने काम करावे. ‘इलेक्टिव मेरीट’ला प्राधान्य देण्याबाबत पक्ष पातळीवर विचार केला जाईल, असेही खा. जाधव म्हणाले.

या वेळी त्यांनी पालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात पदाधिकाऱ्यांची तयारी आणि एकंदरीत आढावा घेतला; तसेच जिल्ह्यातील संघटनात्मक पातळीवर रिक्त व प्रभारी असलेल्या पदांबाबत चर्चा करण्यात आली. आ. गायकवाड यांनी, पदाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना उमेदवारांना निवडून आणण्याच्या दृष्टीने जबाबदारी फिक्स करून अधिक जोमाने काम करून नियोजन केले जावे, असे सांगितले. शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत व सहसंपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनीदेखील याप्रसंगी मार्गदर्शन केले.

या बैठकीस वसंतराव भोजने, भोजराज पाटील, बाबूराव मोरे, तुकाराम काळपांडे, संजय आवताडे, राजू पाटील, शिवाजीराव देशमुख, गजानन धांडे, रामदास चौथनकर, लखन गाडेकर, सुरेश वाळूकर, दादाराव खराडे, सुरेश वावगे, उमेश पाटील, गजानन वाघ, रवी पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

-- ताकद वाढविण्याचे आव्हान--

स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिवसेनेची ताकद पाहता पालिकेच्या जिल्ह्यातील ३०१ जागांपैकी ५१ जागा अर्थात १७ टक्केच जागा शिवसेनेच्या ताब्यात आहेत. जिल्हा परिषदेचा विचार करता अवघ्या १५ टक्के जागा म्हणजेच ९ जागा त्यांच्याकडे आहेत. पंचायत समितीमध्ये २६ जागा अर्थात एकूण जागांच्या तुलनेत २२ टक्केच जागा शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर अधिराज्य गाजविण्यासाठी शिवसेनेला त्यांची संपूर्ण ताकद पणाला लावावी लागणार आहे.

Web Title: Palika, work to get one-sided power on ZP - Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.