शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

२० हजारावर कामगार बांधकाम साहित्याच्या ‘किट’ पासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 16:19 IST

कामगारांना ‘कोणी पेटी देता का पेटी..?’ अशा केविलवाण्या अवस्थेत मोलमजूरी सोडून येथे ताटकळत बसावे लागत आहे.

- सुधीर चेके पाटीललोकमत न्यूज नेटवर्कचिखली : बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून विशेष मोहीम राबविली जात आहे. याअंतर्गत नोंदणी झालेल्या जिल्ह्यातील कामगारांना चिखली येथे ‘किट’ अर्थात बांधकाम साहित्याच्या पेट्यांचे वाटप सुरू आहे. जिल्हाभरातील कामगारांची गर्दी येथे उसळली असून कागदपत्रासहित कामागारांना येथील साहित्य वितरण केंद्रावर भल्या पहाटेपासून दिवसभररांगेत उभे राहावे लागते. किट वाटपबाबात कुठल्याही प्रकारची वेळ ठरविली नसल्याने कामगारांना ‘कोणी पेटी देता का पेटी..?’ अशा केविलवाण्या अवस्थेत मोलमजूरी सोडून येथे ताटकळत बसावे लागत आहे.यामध्ये प्रामुख्याने महिला कामगारांची प्रचंड अबाळ सुरू असल्याचे याठिकाणी दिसून आले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना साहित्य वाटपाची प्रक्रीया चिखली येथील एमआयडीसी स्थित एका गोडाऊनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गेल्या सहा-सात महिन्यांपासून अनेक कामगार झटत आहेत. दरम्यान, नोंदणीकृत बांधकाम कामगारांना कामगार अधिकारी कार्यालयाच्यावतीने साहित्य किट वितरण प्रारंभ झाल्यानंतर हजारो मजुरांनी याकडे मोर्चा वळविला. या योजनेचा लाभार्थी होण्याच्यादृष्टीने प्रयत्नांची पराकाष्टा सुरू आहे. बांधकाम साहित्य किटमध्ये पत्र्याची मोठी पेटी, बूट, टोपी, बॅग, टार्च, हाताचा पंजा, टीफीन, पाण्याची बॉटल आदी वस्तूंचा समावेश असून या योजनेतील लाभार्थी कामगारांच्या खात्यात ५ हजार सरळ जमा केले जात असल्याचेही बोलले जात असल्याने प्रामुख्याने मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या कामगारांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी मजूरीवर पाणी सोडावे लागत आहे. असे असले तरी साहित्याची ‘पेटी’ पदारात पाडून घेण्यासाठी येथील गोडाऊनवर जिल्हाभरातील नोंदणीकृत कामगारांच्या शेकडोंच्या संख्येने रांगा लागल्या आहेत. अनेक कामगारांना पेटीतील साहित्याची चिंता लागली आहे. सोबतच पाच हजार मिळण्याच्या आशेने कामगार अर्जासहित दिवसभर रांगेत उभे राहत असल्याने मजुरी बुडण्यासह मानसिक, शारीरिक व आर्थिक झळ सोसत आहेत. त्यातच याठिकाणी अनेकदा गदारोळ होत आहे. उपाशीपोटी, लहान मुलाबाळांसह रोजगार बुडवून महिलांना येथे बसावे लागते.आॅनलाईन नोंदणी प्रक्रीया मृगजळयोजनेचा लाभ घेण्यासाठी सुरूवातीला नोंदणी करणे आवश्यक असल्याने विविध कागदपत्रे, दाखले आदींची जमवाजमव करून कामगार कल्याणकारी मंडळाकडे रितसर नोंदणीसाठी मोठी कसरत कामगारांना करावी लागते. या अर्जात ठेकेदाराचा शिक्का, सहीची गरज असल्यामुळे ठेकेदाराकडेही गर्दी वाढली आहे. त्याचप्रमाणे उपयोगिता बघता अर्जाचीही किंमत वाढली आणि अर्ज भरून देणाऱ्यांची मागणी वाढली आहे.

तीन हजार पेट्यांचे वाटप

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना कामगार अधिकारी कार्यालयाच्यावतीने येथील साहित्य वितरण केंद्रावरून २३ हजार ७०० पेट्यांच्या वितरणाचे उद्दीष्ट्य देण्यात आले आहे. यापैकी आतापर्यंत सुमारे ३ हजार पेट्यांचे वाटप येथील केंद्रावरून झाली असल्याची माहिती राहुल लाल यांनी दिली आहे. दरम्यान साहित्य वितरणासाठी याठिकाणी कामगारांची कागदपत्रे स्विकारणे, कामगारांच्या आॅनलाईन नोंदणी प्रक्रीया आदी प्रक्रीया पूर्ण केल्यानंतरच साहित्याचे वितरण करण्यात येते.

 

टॅग्स :Chikhliचिखलीbuldhanaबुलडाणा