शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मोताळा तालुक्यात कपाशीवर अज्ञात रोगाचा प्रादूर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 10:50 IST

Outbreak of unknown disease on cotton in Motala taluka : केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे पथक येत्या आठवड्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/धामणगाव बढे : मोताळा तालुक्यातील नळगंगा धरणाच्या परिसरातील पिंप्री गवळी, काबरखेड, सांगळूदसह लगतच्या काही गावातील कपाशी पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याचा संशय असून, त्याच्या पाहणीसाठी आता थेट नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे पथक येत्या आठवड्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रामुख्याने या भागातील शेतातील कपाशीची पिके ही खुजी अर्थात बुटकी राहत असून, त्यांची योग्य पद्धतीने वाढ होत नाही. सोबतच कपाशीची पानेही चुरगळलेल्या सारखी दिसत आहे. यासोबतच फुल आणि फळधारणाही या कपाशीला होत नसल्याचे पाहणीमध्ये समोर आले आहे. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ सी. पी. जायभाये यांनी  कृषी अधिकारी कपील कंकाळ यांच्यासमवेत नुकतीच पिंप्री गवळी भागातील या शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांशीही या विषयावर चर्चा केली आहे. मात्र एकंदरीत प्रकार पाहता या रोगाबाबत अद्याप निष्कर्ष काढण्यात आलेला नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठालाही याची माहिती देण्यात आली असून, काही नमुनेही त्यांना पाठविण्यात आले आहे. सूत्र कृमी संदर्भात आम्हाला शंका आहे, पण अद्यापपर्यंत आम्ही कुठल्या निष्कर्षापर्यंत आलेलो नाही, असेही जायभाये यांनी सांगितले. गेल्या ८ ते दहा वर्षापूर्वी शेलापूर भागातही काही झाडांवर असा प्रकार दिसला होता, पण आता हे प्रमाण वाढत असल्याचे ते म्हणाले.

झाडाची वाढ होत नाहीहा रोग पडलेल्या झाडाची वाढ होत नाही. खोडही वेडेवाकडे वाढते व झाड बुटके राहते. फुले व बोंडे येथ नाही. पाने पिवळी पडतात तथा पानावर लालसर रंग दिसतो, असे प्रत्यक्ष पाहणीत आढळले असल्याचे डॉ. सी. पी. जायभाये म्हणाले.

नमुने तपासणीस पाठविलेया झाडाचे व त्याच्या आसपासच्या मातीचे नमुने घेण्यात आले असून, ते अकोला कृषी विद्यापीठ आणि नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्रात तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहे. दरम्यान, येत्या आठवड्यात नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे पथक पिंप्री गवळी परिसरात पाहणीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ शास्त्र तथा कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख सी. पी. जायभाये यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीMotalaमोताळा