शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बालकांच्या शोधासाठी ऑपरेशन ‘मुस्कान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 11:13 IST

Operation Muskan हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यात येणार असून, बालके आईवडिलांच्या सुपूर्द करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्दे शोध मोहिमेला १ डिसेंबरपासून सुरुवात करण्यात आली.१५ पोलीस स्टेशनमध्ये पथकं गठित करण्यात आले आहे.

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : हरविलेल्या अल्पवयीन मुलांना शोधण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान-२०२०’ ही मोहीम १ ते ३१ डिसेंबर दरम्यान राबविण्याचा आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग यांनी दिला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यात येणार असून, बालके आईवडिलांच्या सुपूर्द करण्यात येणार आहेत.हरविलेली अल्पवयीन मुले, भीक मागणारी, कचरा गोळा करणारी, मंदिर, रुग्णालय परिसरात आढळून येणारी अल्पवयीन मुले शोधण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक आणि महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाच्यावतीने राज्यभरात ‘ऑपरेशन मुस्कान’ राबविण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याचे तीन-चार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक गठित करण्यात आले आहे. नेमून दिलेल्या पथकाकडून हरविलेल्या बालकांच्या शोध मोहिमेला १ डिसेंबरपासून सुरुवात करण्यात आली असून, अशा मुलांना शोधून त्यांना त्यांच्या आईवडिलांच्या सुपूर्द केले जाणार आहे.

पोलीस स्टेशननिहाय पथकं गठित!  हरविलेल्या मुलांना शोधण्याकरिता अपर पोलीस अधीक्षक, खामगाव यांच्या अधिकार क्षेत्रातील १५ पोलीस स्टेशनमध्ये पथकं गठित करण्यात आले आहे. यामध्ये खामगाव विभागातील ८ तर मलकापूर विभागातील ७ अशा एकूण १५ पोलीस स्टेशनचा समावेश आहे.   काही ठिकाणी दोन तर काही ठिकाणी चार सदस्यीय पथक नेमण्यात आले. पथकातील अधिकारी, कर्मचारी हरविलेल्या आणि भीक मागणाऱ्या अल्पवयीन मुलांचा शोध घेणार आहेत.

संपर्क करण्याचे आवाहन!जिल्ह्यात हरविलेले, रस्त्यावर, मंदिर परिसरात किंवा रुग्णालय परिसरात कुठेही अल्पवयीन मुले आढळल्यास पोलीस विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

हरविलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी खामगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत चार सदस्यीय पथक गठित केले आहे. यामध्ये एक अधिकारी, एक महिला अंमलदार आणि दोन पुरुष अंमलदार अशा चार सदस्यांचा समावेश आहे.- सुनील अंबुलकरनिरीक्षक, शहर पोलीस स्टेशन, खामगाव. 

टॅग्स :khamgaonखामगावPoliceपोलिस