शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

खुल्या जागा बनल्या ‘ओपन बार!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:51 IST

मलकापूर: शहरातील मोकळ्य़ा जागा हय़ा ओपन बार बनल्याचे दिसून ये त आहे. यामुळे ठिकठिकाणी अस्वच्छता व दुर्गंधी पसरली असून,  नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 

ठळक मुद्देमलकापूर शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतानागरिक बेहाल 

मनोज पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: शहरातील मोकळ्य़ा जागा हय़ा ओपन बार बनल्याचे दिसून ये त आहे. यामुळे ठिकठिकाणी अस्वच्छता व दुर्गंधी पसरली असून,  नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी उद्यान व मैदान  या दोन अत्यावश्यक बाबी आहेत. मात्र शहरात या बाबींची उणीव  असल्याने अनेक जण फिरण्याकरिता मोकळ्या जागांकडे आपली पावले  वळवितात; परंतु या मोकळ्या जागांना हेरत काही व्यसनाधीन तरुणांनी  आपला अड्डा बनविल्याने या परिसरात काचेच्या बाटल्या, पाणी पाऊच,  गुटख्याच्या पुड्या, सिगारेट पाकिटे आदी तत्सम कचर्‍याचा ढीग अस् ताव्यस्त स्वरूपात आढळून येत असल्याने मोकळ्या जागा म्हणजे ओपन  बार बनल्या असल्याचा प्रत्यंतर मलकापुरात येत आहे.शहरामध्ये उद्यान आहे; परंतु फिरण्याकरिता त्याकडे बोटावर मोजण्याइ तकेच ज्येष्ठ नागरिक जातात. मैदानांचा अभाव असल्याने अनेक जण  मोठय़ा संख्येने वाहतुकीचा रस्ता धरतात; मात्र वाहतुकीचे रस्ते सोयीचे  नसल्याने मोठय़ा प्रमाणात शहरातील नागरिक हे नवीन परिसरात  फिरण्याकडे कल देतात. यामध्ये प्रामुख्याने बिर्ला मंदिरामागील मोकळी  जागा, बुलडाणा रोडवरील मीरा नगर परिसर, पंचमुखी हनुमान मंदिर  मागील घिर्णी रोड, गजानन नगरी आदी भागांना प्राधान्य देतात. या  परिसरात अकृषक जमिनीवर घरे बांधणी सुरू असून, अद्याप पावेतो  पाहिजे त्या प्रमाणात नागरिक राहायला गेलेले नाहीत.हा परिसर शहराबाहेरील नवीन वस्त्यांचा भाग असून, या भागांमध्ये वाह तूक नाही सारखीच असल्याने या ठिकाणी अनेक जण सकाळ,  संध्याकाळ फिरायला येतात; मात्र अंधार पडताच या ठिकाणांसह  क्रीडांगणावरसुद्धा अनेक व्यसनाधीन तरुण टोळक्याने येऊन आपला अड्डा  बनवितात. त्यामुळेच या ठिकाणी दिवसाच्या उजेडात ओपन बारचे पुरावे  आढळून येतात. प्रदूषणमुक्त परिसरात आढळणारे पुरावे परिस्थितीची  जाण करून देतात. अंधार पडताच या ठिकाणी टोळक्यांचा वावर वाढतो.  दुचाकी बाजूला लावून मदिरेचा आस्वाद घेतल्या जातो. सिगारेट ओढून  गुटख्याच्या पिचकार्‍या मारल्या जातात. पाणी पाऊच जागेवरच सोडून  दारू, बिअर व वाइनच्या काचेच्या बाटल्या फेकून दिल्या जातात. 

दारूड्यांच्या त्रासाने नागरिक वैतागले रात्रीच्या वेळी या मोकळ्या जागांवर मद्यपींचा पावर असल्याने सहसा  इकडे कुणी फिरकत नाही. याचाच फायदा घेऊन महाविद्यालयीन तरूण  सुध्दा या जागांना प्राधान्य देतात. कुणाचाही वरदहस्त नसल्याने या टोळ क्यांचे फावत असून या ओपन बार संस्कृतीला वेळीच आवर घालणे  गरजेचे झाले आहे. त्या अनुषंगाने या भागात पोलीस गस्त असावी अशी  अपेक्षा शहरातील सुजाण नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहे. 

टॅग्स :zpजिल्हा परिषद