शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ३२२ होमगार्ड भरतीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 14:34 IST

अनेक दिवसांपासून सुरू असलेला होमगार्ड भरती प्रक्रियेचा मार्ग अखेर मोकळा झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाची तयारी सुरू आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेला होमगार्ड भरती प्रक्रियेचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, जिल्ह्यात ३२२ नवीन होमगार्डची निवड करण्यात आली आहे. या नवीन होमगार्डची जिल्ह्यातील सात तालुक्यातील पोलीस ताफ्याला साथ लाभणार आहे.पोलिसांच्या खांद्याला खांदा लाऊन गृहरक्षक दलाचे सदस्य आपली भूमिका चोखपणे पार पाडत असतात. पोलिसांच्या कमी संख्याबळामुळे होमगार्डची पोलिसांना नेहमीच मदत होत असते. आगामी गणेशोत्सव, दुर्गाउत्सव, यात्राबंदोबस्त, निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन प्रशासनाकडून होमगार्ड भरती प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून राबविण्यात येत आहे. जिल्हा होमगार्ड विभागात अनेक दिवसांपासून ही भरती प्रकिया राबवण्यात येत होती.पोलिसांना बंदोबस्तासाठी मदत म्हणून होमगार्डचा वापर करण्यात येतो. होमगार्डच्या पदासाठी समुपदेकशक विभागाकडून अनेक वेळा नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते.तालुकानिहाय ही भरती प्रक्रिया असून उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीनंतर त्यांची शारीरिक तपासणी करण्यात आली. हे उमेदवार यामध्ये पात्र ठरले त्यांची शारीरिक चाचणीसाठी निवड करण्यात आली. पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर; शारीरिक चाचणी घेण्यात आली. जिल्हा समादेशक होमगार्डकडून जिल्ह्याकरीता ३२२ होमगार्डची निवड करण्यात आली आहे. या नवीन होमगार्डची नियुक्ती सात तालुक्यात पथकामध्ये करण्यात आली आहे. त्यामध्ये बुलडाणा, चिखली, खमगाव, जळगाव जामोद, मलकापूर, देऊळगाव राजा व मेहकर या तालुक्यांचा समावेश आहे. या होमगार्डची अंतिम पथक निहाय निवड यादी विभागाने जाहीर केली असून, पुढील प्रक्रियेच्या हालचाली सुरू आहेत.पथक निहाय होमगार्डजिल्ह्यात एकूण ३२२ होमगार्ड नवीन नेमण्यात आले आहेत. त्यामध्ये बुलडाणा पथकामध्ये ६४ होमगार्ड, चिखली पथकामध्ये ४७, खामगाव ४४, जळगाव जामोद ३, मलकापूर ३०, देऊळगाव राजा ४६ व मेहकर पथकामध्ये ४४ होमगार्डची निवड करण्यात आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिस