शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

खुल्या बाजारात कापसाला ५७०० रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 12:51 IST

Cotton News कापसाचा दर ५७०० रुपये क्विंटलच्या घरात पोहोचला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क  खामगाव : प्रारंभी खुल्या बाजारात कापसाचे दर ५४०० ते ५५०० रुपये क्विंटलच्या घरात होते. आता कापसाचा दर ५७०० रुपये क्विंटलच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे शासकीय केंद्रांकडे विक्रेत्यांनी पाठ फिरविली आहे. शासकीय हमी केंद्रांमध्ये कापूस विक्रीसाठी येणा-या शेतक-यांचा कल वाढला होता. मात्र, आता कापसाला ५६०० ते ५७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. खुल्या बाजारात कापसाचा दर ५७०० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे शेतकरी आता खुल्या बाजाराकडे वळले आहेत. दरवर्षी १५ जानेवारीनंतर कापसाच्या दरात घसरण होते. यावर्षी मात्र उलटे चित्र आहे. १५ जानेवारीनंतर कापूस घसरेल आणि वाढत्या उन्हाचाही वजनावर परिणाम होईल, यामुळे शेतक-यांनी १५ जानेवारीपूर्वीच मोठ्या प्रमाणात कापसाची विक्री केली. त्यातच, गुलाबी बोंडअळी आल्याने कापसाची उलंगवाडी लवकर झाली. खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव, घाटपुरी, पळशी बु. या भागातील शेतक-यांच्या कापसाच्या उत्पादनात ५० टक्के घट आली आहे. जिल्ह्यातही बहुतांश भागातील शेतक-यांना बोंडअळीमुळे ५० टक्केच उत्पादन झाले आहे. यामुळे शेतक-यांच्या घरात आता मोजकाच कापूस शिल्लक राहिला आहे. कृषी अधिका-यांनी फरदडीचा कापूस घेऊ नये, असे आवाहन केले आहे. फरदडीचा कापूस घेतला तर बोंडअळीचा प्रादुर्भाव पुढील वर्षीही कायम राहील तसेच आणखी वाढ होईल, असा इशारा कृषी विभागाने दिल्यामुळे अनेक शेतक-यांनी फरदडीचा कापूस घेतला नाही. त्यामुळेही कापसाच्या आवकमध्ये घट झाली आहे. 

वाढलेल्या दराचा फायदा व्यापाऱ्यांनाच  सीसीआयने कापसाची खरेदी सुरू केली. मात्र, बोंडसड व बोंडअळीने कापसाची प्रत घसरल्यामुळे कापसाला भाव कमी मिळाला. त्यामुळे शेतक-यांनी खासगी व्यापाऱ्यांना कापसाची विक्री केली. व्यापाऱ्यांनी सुरुवातीला कापूस निघाल्यावर कमी भावात खरेदी केला.  व्यापा-यांनी गावातून ५३०० रुपयांपासून कापसाची खरेदी केली आहे. आता कापसाला ५६०० ते ५७०० रुपये भाव मिळत आहे. आता क्विंटलमागे ४०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे वाढलेल्या दराचा फायदा खरेदी करणा-या व्यापा-यांनाच होणार आहे.  

बोंडअळीच्या कारणाने हमी केंद्रावर दर मिळेना हमी दर ५७२५ रुपये क्विंटल आहे. लांब धाग्याच्या कापसालाच चांगला दर आहे. गुलाबी बोंडअळीने कापूस डॅमेज झाला. आता याच कारणाने हमी केंद्रावर ५६०० दरापर्यंत कापसाची खरेदी होत आहे. खुल्या बाजारात त्यापेक्षा १०० रुपये अधिक दर मिळत आहे. शिवाय, नगदी पैसे मिळणार आहेत. यामुळे खुल्या बाजाराकडे शेतक-यांचा कल सोमवारपासून वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :cottonकापूसkhamgaonखामगाव