शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Video : ... 'तरच मी विधानसभा निवडणूक लढवणार, संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 20:57 IST

बुलडाणा येथे युवा सेनेची जनआशिर्वाद यात्रा 29 ऑगस्ट रोजी आली असता स्थानिक विश्रामगृहामध्ये ‘लोकमत’शी बोलताना आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केले.

ठळक मुद्देबुलडाणा येथे युवा सेनेची जनआशिर्वाद यात्रा 29 ऑगस्ट रोजी आली असता स्थानिक विश्रामगृहामध्ये ‘लोकमत’शी बोलताना आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केले.

बुलडाणा - 14 व्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने युतीमध्ये शाब्दीक फेकाफेक सुरू आहे. त्या पृष्ठभूमीवर भाजप-शिवसेना एकमेकांचा विश्वासघात करणार नाही, अशी भूमिका युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुलडाणा येथे व्यक्त केली. दरम्यान, युती संदर्भात दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी जनतेसमोर भूमिका स्पष्ट केली आहे. सर्व काही जनतेसमोर झालेले आहे, असेही ते म्हणाले.

बुलडाणा येथे युवा सेनेची जनआशिर्वाद यात्रा 29 ऑगस्ट रोजी आली असता स्थानिक विश्रामगृहामध्ये ‘लोकमत’शी बोलताना आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान, विधानसभानिवडणूक लढविण्यासंदर्भात आपण अद्याप काही फिक्स केलेले नाही. निवडणूक लढावी की नाही, हे जनताच ठरवेल, जनताच मला आदेश देईल, असे म्हणत निवडणूक लढविण्याचे संकेत आदित्य यांनी दिले आहेत. जनताच मला सांगेल, त्यानंतरच मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेईन, असे आदित्य म्हणाले. मतदारसंघ म्हणजे आपली कर्मभूमी असते, संपूर्ण महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे. मी अजून कुठेही फिक्स केलेलं नाही. पण, मी लढवायची की नाही हे जनताच आदेश देईल मला, अशा शब्दात निवडणूक लढविण्यास आपण जनतेला विचारुनच निर्णय घेणार असल्याचे ठाकरेंनी म्हटलंय. शिवसेनेमुळे 10 लाख शेतकऱ्यांना पीकविमा मिळालाय. आता, सरसकट कर्जमाफी हेच आमचं उद्दिष्ट असल्याचंही आदित्य यांनी म्हटलं. 

दरम्यान, आदित्य यांच्यासाठी मुंबईतील सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई शहर अध्यक्षांना शिवबंधन बांधण्यात आल्याने त्यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात युवा सेना प्रमुखांना शिवसेनेचे उमेदवार म्हणून उतरविण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी विधानसभा मतदारसंघाची शोधाशोध सुरू असतानाच बुधवारी दिग्रसचे शिवसेनेचे आमदार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनीच थेट आदित्य यांच्यासाठी आपला सुरक्षित दिग्रस विधानसभा मतदारसंघ सोडण्याची जाहीर तयारी दर्शविली. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019