शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

अंगणवाडीत विद्यार्थी केवळ पटावरच

By admin | Updated: July 5, 2017 13:50 IST

अंगणवाड्यांमध्ये अनेक मुले केवळ पटावरचशिक्षण घेत असून, प्रत्यक्षात विद्यार्थी उपस्थितच नसल्याचा धक्कादायकप्रकार उघडकीस आला आहे.

सिंदखेडराजा: तालुक्यामध्ये शहरासह गावागावात वस्तीवाड्यावर शासनानेअंगणवाड्या सुरु केल्या. या अंगणवाड्यांमध्ये अनेक मुले केवळ पटावरचशिक्षण घेत असून, प्रत्यक्षात विद्यार्थी उपस्थितच नसल्याचा धक्कादायकप्रकार उघडकीस आला आहे.    संवर्ग विकास अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी महेश सुळे यांनी माळसावरगाव सह शहरातील अंगणवाड्यांना ३ जुलै रोजी सकाळी ९.३० ते ११ वाजताभेटी दिल्या. सावरगाव माळ येथील अंगणवाडीत एकही बालक आढळून आला नाही.सिंदखेडराजा तालुक्यामध्ये २०३ अंगणवाडी व ७ मीनी अंगणवाडी अशा २१०अंगणवाड्या आहेत. त्यामध्ये ६ हजार ७६० मुले व ५ हजार ९७८ मुली अशी एकूण१२ हजार ७३८ पटसंख्या कागदोपत्री नोंद आहे. ९ जुन्या व ६८ अंगणवाड्यंनानविन इमारती आहेत. अंगणवाडीची वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत आहे. ६महिने ते ३ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना शिरा ९६० ग्रॅम, उममा ९६०ग्रॅम, सातु ९६० ग्रॅम व पॅकबंद पाकीट पंचविस दिवसासाठी तीन पाकीट घरपोचची सुविधा आहे. गरोदर स्तनदा मातांना शिरा ११२० ग्रॅम, उपमा सुकळी ११२०ग्रॅम व पॅकबंद पाकीट २५ दिवसासाठी ३ पाकीट घरपोच, ३ ते ६ वर्षलाभार्थ्यांना गरम ताजा आहार खिचडी, कडधान्य, उसळ, लापसी ९० ग्रॅम तांदूळव १० ग्रॅम दाळ, २० ग्रॅम मटकी, २० ग्रॅम वटाना उसळ दररोज केंद्रामध्येदेण्यात यावा. किशोर मुली १५ ते १८ वयोगटातील उपमा, सातु, शिरा व २५दिवसासाठी ३ पॅकबंद पाकीट घरपोच देण्याचा शासन प्रयत्न करीत आहे.  मात्र३ जुलै रोजी आमचे प्रतिनिधी व संवर्ग विकास अधिकारी तथा बालविकास प्रकल्पअधिकारी महेश सुळे यांनी माळ सावरगाव येथील अंगणवाडीला भेट दिली असताएकही बालक उपस्थित नव्हते. बालकांच्या घरोघरी जाऊन पालकांच्या भेटीघेतल्या असता बालक अंगणवाडीत किती वाजता जाते किती वाजता घरी येते,बालकांना पोषण आहार काय दिल्या जातो तर तांदळाच्या खिचडी शिवाय काहीसांगता आले नाही. बालकांना पूर्वशालेय शिक्षण, गीत, गाणे, खेळ शिकविल्याजाते काय, याबद्दल पालक अनभिज्ञ असून शेतामध्ये कामे सुरु असल्यामुळेबालकांना शेतात घेऊन जावे लागते. अंगणवाड्या प्रकल्पा संदर्भात पालकसंभ्रमावस्थेत दिसले. तर सिंदखेडराजा येथील अंगणवाड्यांना सकाळी ९ ते १०वाजता भेटी दिल्या असता तीन अंगणवाड्यांना ताळे लावलेले असून त्या बंदचदिसल्या, अशीच अवस्था तालुक्यातील बहुसंख्य अंगणवाड्यांची असूनप्रशासनातील यंत्रणेची उदासिनता दिसून आली. शासनाचा हेतु साध्यकरण्यासाठी शासन, स्थानिक शासकीय यंत्रणा, ग्रामपंचायत, पदाधिकारी व पालकयांनी समन्वयाने योजनेचा उद्देश सफल करण्यासाठी कठोर प्रयत्न व वैयक्तीकसहभाग नोंदविणे काळाची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)