शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ७२ विद्यार्थ्यांनाच मायबोलीचा लळा! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:34 IST

बुलडाणा :  कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस २७ फेब्रुवारी मराठी भाषा  गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषा संवर्धनास सध्या  प्रशासकीय पातळीवरून प्राधान्य देण्यात येत असले तरी मातृभाषा  असलेल्या मराठी विषयाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.  जिल्ह्यात एम.ए. मराठीची सुविधा तीन महाविद्यालयामध्ये उपलब्ध  असून त्यातही जवळपास ७२ विद्यार्थ्यांचेच प्रवेश आहेत. 

ठळक मुद्देमराठी विषयाकडे पाठ तीन ठिकाणीच एम.ए.मराठीचे महाविद्यालय

ब्रम्हानंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस २७ फेब्रुवारी मराठी भाषा  गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषा संवर्धनास सध्या  प्रशासकीय पातळीवरून प्राधान्य देण्यात येत असले तरी मातृभाषा  असलेल्या मराठी विषयाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.  जिल्ह्यात एम.ए. मराठीची सुविधा तीन महाविद्यालयामध्ये उपलब्ध  असून त्यातही जवळपास ७२ विद्यार्थ्यांचेच प्रवेश आहेत. जी मराठी भाषा बोलत आपण लहानाचे मोठे झालो त्या भाषेचा आणखी  सखोल अभ्यास करून मराठीचा समृद्ध वारसा जाणण्यासाठी मराठी  भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी (एमए) ची सुविधा महाविद्यालयांमध्ये  आहे. परंतू सध्या अनेक विद्यार्थी मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर  पदवी (एम.ए.) करण्यास नकार देत असल्यामुळे मायबोली मराठी  भाषेचा लळा दिवसेंदिवस कमी होत चालल्याचे दिसून येते. माय मराठी  या भाषेप्रती आदर व्यक्त करण्यासाठी मराठी साहित्यातील ऋषितुल्य  व्यक्तिमत्व असलेले साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या  २७ फेब्रुवारी  जन्मदिनाचे औचित्य साधुन ‘मराठी राजभाषा दिवस’ साजरा केला जा तो. मराठी भाषेचा समृद्ध वारसा टिकूण ठेवण्यासाठी मराठी राजभाषा  दिनानिमित्त प्रशासकीय पातळीवरूनही विविध कार्यक्रम राबविले जाता त. मात्र मराठी भाषा अभ्यासाकडे विद्यार्थ्यांचा कल कसा, वाढेल  याकडे दुर्लक्ष होत असल्याने मराठी भाषेविषयीचे हे प्रयत्न केवळ मराठी  राजभाषा दिनापुरतेच र्मयादित राहत आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने अत्यं त मोठा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात मराठी भाषा विषयामध्ये  पदव्युत्तर पदवी (एम.ए.) करण्याची सुविधा केवळ तीनच  महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहे. त्यातही विद्यार्थ्यांची संख्या केवळ  ७२ असल्याने  मातृभाषा मराठीकडे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे  दिसून येत आहे. बुलडाणा येथील जिजामाता महाविद्यालयामध्ये  एम.ए.ची सुविधा असून याठिकाणी केवळ २0 विद्यार्थी एम.ए.करत  आहेत. तर चिखली येथील शिवाजी महाविद्यालयात जवळपास २४  आणि मलकापूर येथील जनता कला महाविद्यालयात २८ विद्यार्थी  मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी (एम.ए.) चे शिक्षण घेत आहे त. एका महाविद्यालयात ८0 ते १00 विद्यार्थी प्रवेशाची क्षमता अस तानाही केवळ २0 ते २५ टक्केच  विद्यार्थी एम.ए.मराठी साठी प्रवेश घे त आहेत.  बहिश्यालस्तरावर एम.ए. मराठी परीक्षेस बंदी एम.ए.ची सुविधा असलेले महाविद्यालये विनाअनुदानीत असल्याने  विद्यार्थ्यांकडून जास्त प्रवेश शुल्क आकारतात. त्यामुळे अनेक विद्यार्थी  महाविद्यालयात प्रवेश न घेता बाहेरून म्हणजे बहिश्यालस्तरावर मराठी  भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी (एमए) ची परीक्षा देत होते. मात्र  २0१७-१८ या शैक्षणिक सत्रापासून बहिश्यालस्तरावर एम.ए. मराठी  परीक्षेस बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे एम.ए. ची परीक्षा  देण्यासाठी महाविद्यालयातच प्रवेश घ्यावा लागणार आहे. 

पश्‍चिम विदर्भात ३५ महाविद्यालयात एम.ए.मराठी  पश्‍चिम विदर्भातील बुलडाणासह अमरावती, अकोला, वाशिम, यव तमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांमध्ये ३५ महाविद्यालयात मराठी  भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी (एम.ए.) ची सुविधा आहे. 

 मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी (एम.ए.) ची परीक्षा देण्यासाठी  बहिश्यालस्तरावरील पद्धत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता  २0१८-१९ या शैक्षणिक सत्रापासून महाविद्यालयातील  एम.ए.मराठीचे  प्रवेश वाढू शकतात. तसेच भाषा संवर्धनासाठी मराठी विभागाकडून  विविध कार्यक्रमही घेण्यात येतात.- प्रा. अनंत सिरसाट,मराठी विभाग प्रमुख, जिजामाता महाविद्यालय, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाMarathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2018