शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जामोद तालुक्यात फक्त १७.६ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 19:38 IST

Only 17.6 mm rainfall in Jalgaon taluka : पाऊस येईलच या आशेने पेरणीची घाई केली त्यांची पेरणी उलटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

- नानासाहेब कांडलकरजळगाव जामोद : जिल्ह्यात सर्वाधिक 159.4 मिमी पाऊस मेहकर तालुक्यात झाला असून सर्वात कमी ७.१ मिमी पाऊस शेगाव तालुक्यात झाला आहे. जळगाव जामोद तालुक्यात सुद्धा 16 जून पर्यंत फक्त  १७.६  मिमी पाऊस झाला असून ज्या शेतकऱ्यांनी पाऊस येईलच या आशेने पेरणीची घाई केली त्यांची पेरणी उलटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.    जळगाव जामोद उपविभागात जळगाव व संग्रामपूर हे दोन तालुके येतात जळगाव तालुक्यात केवळ 17.6 मिमी पाऊस झाला असताना संग्रामपूर तालुक्यात चक्क 94.1  मिमी पावसाची नोंद झाली आहे .याचा अर्थ वरून राजाचा असमतोल किती मोठा आहे हे लक्षात येते. जिल्ह्यात घाटावरील सहा तालुक्यात वरुणराजाची मेहेरनजर चांगली असल्याचे दिसून येते. तर घाटाखालील सात तालुक्यात खामगाव व संग्रामपूर हे दोन तालुके सोडले तर इतर तालुक्यावर मात्र वरुणराजा रुसलेलाच  दिसून येतो .            16 जून पर्यंत बुलढाणा तालुक्यात 43.8 मिमी ,चिखली तालुक्यात 126.4 मिमी, देऊळगाव राजा तालुक्यात 43.9 मिमी, सिंदखेडराजा तालुक्यात 115.2 मिमी,लोणार तालुक्या 70.4 मिमी तर मेहकर तालुक्यात सर्वाधिक 159.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर घाटाखालील खामगाव तालुक्यात 100.2 मिमी, शेगाव तालुक्यात फक्त 7.1 मिमी, मलकापूर तालुक्यात 25.2 मिमी, नांदुरा तालुक्यात 43.5 मिमी,मोताळा तालुक्यात 24.9मिमी, संग्रामपूर तालुक्यात 94.1मिमी तर जळगाव जामोद तालुक्यात 17.6 मिमी पाऊस झाला आहे. याचा अर्थ कृषी विभागाच्या निर्देशाप्रमाणे घाटाखालील खामगाव व संग्रामपूर या दोन तालुक्यातच पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. इतर 5 तालुक्यात मात्र 75 ते 100 मिमी पाऊस न झाल्याने या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करणे धोक्याचे ठरणार आहे.       घाटावरील चिखली, मेहकर, सिंदखेडराजा व लोणार या 4 तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाला असून बुलढाणा व सिंदखेड राजा हे दोन तालुके मात्र 75 मिमी पेक्षा कमी पावसाचे असल्याने तिथे पेरणीयोग्य पाऊस नाही. लोणार तालुक्यात 17.4 पाऊस झाल्याने तेथे पेरणी उलटण्याची भीती कमी आहे .

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदRainपाऊस