अमडापूर (जि. बुलडाणा) : शेतातून रस्ता नसताना ट्रॅक्टर व बैलगाडी घेऊन जाणार्यास हटकणार्यास एका इसमाला दोघांनी मारहाण केली. ही घटना १ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास वरखेड शिवारात घडली. मधुकर परसराम रावे यांनी अमडापूर पोलिसात तक्रार दिली की, १ जुलै रोजी दुपारी ते शेतात काम करीत होते. त्यांच्या शेतातून रस्ता नसताना सदाशिव लक्ष्मण रावे, समाधान सदाशिव रावे दोघेही रा.वरखेड यांनी ट्रॅक्टर व बैलगाडी नेली. दरम्यान, मधुकर रावे यांनी त्यांना हटकले असता, या दोघांनी शिवीगाळ करीत त्यांना मारहाण केली. या तक्रारीच्या आधारे सदाशिव रावे, समाधान रावे या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे.
शेतरस्त्याच्या वादातून एकाला मारहाण
By admin | Updated: July 2, 2016 01:20 IST