शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाच्या ताेंडावर एक लाख शेतकऱ्यांना पीककर्जाची प्रतीक्षा! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 12:29 IST

Crop loan : पीककर्ज वाटप संथ गतीने हाेत असल्याचे चित्र आहे. 

- संदीप वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : खरीप हंगाम तोंडावर आला असून, बँकांच्या उदासीन धाेरणामुळे एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीककर्जाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत केवळ २३ टक्के शेतकऱ्यांना कर्ज मिळाले आहे. पालकमंत्र्यांनी आढावा बैठक घेऊन पीककर्ज तातडीने वाटप करण्याचे आदेश बॅंकांना दिले हाेते. तरीही पीककर्ज वाटप संथ गतीने हाेत असल्याचे चित्र आहे.    राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना या नावाने दीड लाखापर्यंत शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशाची जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात अंमलबजावणी झालेली दिसत नाही. त्यामुळे अजूनही अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. पीककर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे. कर्जमाफी झाली नसलेल्या शेतकऱ्यांनाही पुनर्गठन करून देण्यास बँक तयार नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी जिल्ह्यात एक हजार ७७३ कोटी ७७ लाखांचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले आहे. दरवर्षीप्रमाणे बँकांची पीककर्ज वाटपासंदर्भात उदासीनता दिसून येत आहे. शेती मशागतीची कामे पूर्ण झाली असून, आता त्यांना पीककर्जाची अत्यंत आवश्यकता आहे. आतापर्यंत बँकांनी फक्त २९० काेटी ४४  लाखांपर्यंत पीककर्ज वाटप केले आहे. उद्दिष्टापैकी अत्यल्प कर्ज वितरण करण्यात आले आहे. हीच भूमिका बँकांची असली तर शेतकऱ्यांना सावकारांच्या दरवाजात जावे लागेल. यामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण पुन्हा वाढल्याशिवाय राहाणार नाही.जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: पीककर्ज वितरणाकडे लक्ष केंद्रित करून बँकांच्या माध्यमातून युद्धपातळीवर पीककर्ज वाटप करून घ्यावे, अशी मागणी हाेत आहे. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची भटकंती हाेत आहे.

३२ हजार शेतकऱ्यांनाच मिळाले कर्ज यावर्षी जिल्ह्यात एक लाख ४० हजार शेतकऱ्यांना एक हजार ३०० काेटी रुपये पीककर्ज वाटपाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. ८ जूनपर्यंत बॅंकांनी केवळ ३२ हजार १७९ शेतकऱ्यांना २९० काेटी ४४ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. लक्ष्यांकापैकी केवळ २२ टक्के शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले आहे. एक लाख सात हजार ८२१ शेतकऱ्यांना पीककर्जाची प्रतीक्षा आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्जाचे पुनर्गठण केलेले नाही. त्यामुळे, त्यांना बॅंकांकडून पीककर्ज मिळत नसल्याचे चित्र आहे. अनेक शेतकऱ्यांनी कागदपत्रे बॅंकांमध्ये जमा केलेले नाही. काही बॅंकांकडूनही शेतकऱ्यांना कर्ज नाकारण्यात येत असल्याचे चित्र आहे. खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याची गरज आहे. 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbuldhanaबुलडाणाFarmerशेतकरी