शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील एक लाख बालकांचा हिरावल्या जातोय पोषण आहार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 11:08 IST

Buldhana News ९७ हजार ४४३ अंगणवाडीतील बालके गत दीड महिन्यांपासून पोषण आहारापासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील तब्बल ९७ हजार ४४३ अंगणवाडीतील बालके गत दीड महिन्यांपासून पोषण आहारापासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याप्रकरणी पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात येत असल्याचे समोर येत आहे, हे येथे उल्लेखनिय!बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच १३ तालुक्यांमध्ये असलेल्या अंगणवाडीतील ०३ ते ०६ वर्ष वयोगटातील लाभार्थी यांना टीएचआर स्वरूपात घरपोच आहार वाटप करण्यासाठी बुलडाणा जिल्हापरिषद प्रशासनाने महाराष्ट्र राज्य स्टेट को. ऑफ कन्झ्युमर्स फेडरेशन लि. मुंबई यांना १५ जानेवारी रोजी पुरवठा आदेश दिला आहे. गहू, तांदूळ, मसूर डाळ, चना, मिरची, हळद, मिठ, सोयाबीन तेल अशा कच्च्या धान्याचे किट वितरीत करण्यासाठी जिल्ह्यातील कोणत्याही अंगणवाडीत पुरवठा न झाल्यामुळे पोषण आहार लाभार्थी आहारापासून वंचित राहत आहेत. मात्र, याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आता या प्रश्नी जिल्हा प्रशासन नेमकी कोणती भुमिका घेते याकडे लक्ष लागून राहलेले आहे. घडलेला प्रकार हा गंभीर असून पालकमंत्री याप्रकरणी दोषींवर कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागून आहे.

दीड महिन्यांपासून आहाराचा पुरवठाच नाही! माहे १६ फेब्रुवारी ते १५ एप्रिल २०२१ या दोन महिन्यांच्या कालाधीत बालकांना कच्चे धान्य आणि किराणा माल पोहोचविण्याचे पुरवठा आदेश असतानाही मार्च महिन्यांपर्यंतही जिल्ह्यातील अनेक अंगणवाडीमध्ये पोषण आहार वितरीत केला गेला नाही.  त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच १३ तालुक्यांमधील ९७ हजार ४४३ बालकांचा पोषण आहार जिल्हा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हिरावला जात असल्याचे दिसून येते. पालकमंत्र्यांच्या आदेशावर चौकशी न करताच पुरवठ्याचे आदेश दिल्याचे दिसून येते.बुलडाणा तालुक्यातील काही तालुक्यातील अंगणवाडीमध्ये पोषण आहाराचा पुरवठा सुरू झाला आहे. काही तालुके अद्यापही बाकी आहेत.- गजानन शिंदेबाल विकास प्रकल्प अधिकारी, बुलडाणा

खामगाव तालुक्यात ०२ मार्चपर्यंत पोषण आहाराचा पुरवठा करण्यात आलेला नव्हता. पुरवठ्याबाबत चौकशी करून निश्चित सांगता येईल.- राजेश वाघबाल विकास प्रकल्प अधिकारी, खामगाव. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावStudentविद्यार्थी