शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

देऊळगाव राजात दुचाकी अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 10:40 IST

भरधाव वेगात जाणारी दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार झाला.

ठळक मुद्देघटना शनिवारी सायंकाळी शहरातून जाणाऱ्या चिखली मार्गावरील एका हॉस्पीटल समोर घडली. एका युवकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास जालना येथे हलविण्यात आले आहे.

देऊळगाव राजा: भरधाव वेगात जाणारी दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी शहरातून जाणाऱ्या चिखली मार्गावरील एका हॉस्पीटल समोर घडली. या अपघातातील एका युवकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास जालना येथे हलविण्यात आले आहे.शनिवारी रात्री तीन युवक दुचाकीवर औरंगाबादला जाण्यासाठी निघाले होते. शहरातून जाणाºया चिखली मार्गावर असलेल्या शहरातील एका हॉस्पीटल समोर वेगात जाणारी ही दुचाकी नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर आदळली. अपघातानंतर नागरिकांनी तिघा युवकांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघातात दुचाकीवर दोन मित्रांच्यामध्ये बसलेला नीलेश प्रमोद हाके (२२, रा. संभाजीनगर, चिखली) हा युवक डोक्याला जबर मार लागल्याने जागीच ठार झाला. मनोज फुलचंद कठाळे (२२, रा.अंचरवाडी) व गणेश बबन देशमुख (२२, रा.चिखली) दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यातील एका युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जालना येथे हलविण्यात आले आहे. अपघातातील या तीनही तरुणांवर डॉ. योगेश कायंदे, डॉ. पवन डोईफोडे, डॉ. सांगळे यांनी तातडीने उपचार केले. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. रविवारी सकाळी मृतक नीलेश हाके या युवकाच्या मृतदेहाचे देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर चिखली येथे रविवारी दुपारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :Deulgaon Rajaदेऊळगाव राजाAccidentअपघातbuldhanaबुलडाणा