शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

टिप्परखाली दबल्याने एकाचा मृत्यू, तीघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 18:03 IST

Accident News : अवैधपणे रेती नेणारे टिप्पर हिंगणा ते दादगाव दरम्यान उलटल्याने त्याखाली मलकापूरमधील चार मजूर दबले.

नांदुरा : अवैधपणे रेती नेणारे टिप्पर हिंगणा ते दादगाव दरम्यान उलटल्याने त्याखाली मलकापूरमधील चार मजूर दबले. दबलेल्या मजुरांना जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आले. त्यापैकी तीन गंभीर जखमी झाले. एका मजुराला पुढील उपचारासाठी अकोल्याला नेत असल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना १३ जूनच्या रात्री अकरा वाजताच्या दरम्यान घडली.पूर्णा नदी तीरावरील हिंगणा, भोटा, येरळी, रोटी, बेलाड, गौलखेड या गावांमध्ये पूर्णा नदीपात्रातील रेती सरकारी जागेवर आणून हजारो ब्रास रेतीचे शेकडो साठे तयार केले आहेत. त्या साठ्यातून अवैध रेती वाहतूक करताना टिप्पर क्रमांक एमएच-२१ एक्स-४४२१ चा चालक दशरथ ठाकरे याने भरधाव वाहन चालवले. टिप्पर हिंगणा ते दादगाव दरम्यान उलटले. त्यावेळी मजूर सलमान खान अयुब खान (वय २१), भिकनशाह रहिमशाह (वय २१), सोहिल शाह मुनाब शाह (वय १९), समीर शाह हईम शाह (वय १८) हे सर्व टिप्परखाली दबले. याबाबतची माहिती रात्रीच्या वेळी लोकेशनवर असलेल्या रेती माफियांनी मिळताच त्यांनी व काही सामाजिक कार्यकर्त्यानी घटनास्थळी धाव घेतली. मजुरांना जेसीबीच्या साहाय्याने काढून प्रथम त्यांना नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यानंतर खामगाव येथे उपचाराकरीता भरती करण्यात आले. मात्र, सोहिल शाह मुनाब शाह याला अकोला येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाल‍ा. या अपघात याप्रकरणी जलंब पोलिसांनी चालक दशरथ ठाकरे रा. वाघूड तालुका मलकापूर याच्याविरूध्द गुन्ह्याची नोंद केली. या अपघाताची माहिती मिळताच युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस निलेश पाऊलझगडे, विनल मिरगे, ओमसाई फाऊंडेशनचे विलास निंबोळकर, प्रवीण डवंगे, आनंद वावगे, अमोल घोराडे यांनी तात्काळ जेसीबी बोलावून मजुरांना बाहेर काढले. त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ हलविले . 

टॅग्स :NanduraनांदूराAccidentअपघात