लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: दुचाकी व चारचाकी वाहनाची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये एक जण ठार झाल्याची घटना बुलडाणा-दुधा मार्गावर तांदुळवाडी फाट्यानजीक शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, या अपघातात एक जण गंभीर जखमी असून, जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.बुलडाणा-दुधा मार्गावर तांदुळवाडी फाट्यानजीक रात्री हा अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने तांदुळवाडी येथील अर्जुन वाणी, बाबुराव वाणी व दुधा येथील विकास इंगळे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र दुचाकीवरील दोघा गंभीर जखमींपैकी एक असलेल्या गजानन शेषराव पवार (३६) यास डॉक्टरांनी मृत घोषित केले तर मातला येथील शंकर रामदास राखोंडे हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
बुलडाणा-दुधा मार्गावर दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 12:00 IST
Buldhana Accident News बुलडाणा-दुधा मार्गावर तांदुळवाडी फाट्यानजीक रात्री हा अपघात घडला.
बुलडाणा-दुधा मार्गावर दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर
ठळक मुद्देगजानन शेषराव पवार (३६) यास डॉक्टरांनी मृत घोषित केले.शंकर रामदास राखोंडे हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.