शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

दुचाकी अपघातात एक ठार; एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:08 IST

डोमरूळ: येथील विनेश साहेबराव पडोळ (वय ४३) या तरुण शेतकर्‍याचा चिखली येथील लग्नसमारंभ आटोपून परतताना हॉटेल स्वरंजलीजवळ अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ९.४५ वाजता घडली. या अपघातात एक गंभीर जखमी झाला असून, डोमरूळ गावावर शोककळा पसरली आहे.

ठळक मुद्देचिखलीजवळ झाला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कडोमरूळ: येथील विनेश साहेबराव पडोळ (वय ४३) या तरुण शेतकर्‍याचा चिखली येथील लग्नसमारंभ आटोपून परतताना हॉटेल स्वरंजलीजवळ अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ९.४५ वाजता घडली. या अपघातात एक गंभीर जखमी झाला असून, डोमरूळ गावावर शोककळा पसरली आहे.बुलडाणा तालुक्यातील डोमरूळ येथील विनेश साहेबराव पडोळ आणि मनोहर किसन पडोळ हे दोघे चिखली येथील लग्नसमारंभ आटोपून रविवारी रात्री ९:४५ दरम्यान आपल्या मोटारसायकलने परतत असताना समोरून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. लग्नसमारंभ जवळच असल्यामुळे त्या दोघांना लवकरच दवाखान्यात नेण्यात आले. दोघांच्याही पायाला,  डोक्याला गंभीर इजा झाली असल्यामुळे औरंगाबाद नेत असताना बदनापूरजवळ विनेश पडोळ यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या पश्यात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई, वडील, भाऊ असा आप्त परिवार आहे. विनेश पडोळ यांच्या निधनाची बातमी कळताच गावातील तरुण होतकरू शेतकरी जाण्याने शोककळा पसरली.  या अपघाताची नोंद चिखली पोलीस स्टनेशनला करण्यात आली असून, अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा