पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये खामगाव तालुक्यातील एक, शेगाव एक, देऊळगाव राजा एक, चिखली १५, मलकापूर एक, लोणार एक, जळगाव जामोद तीन याप्रमाणे कोरोना बाधितांचा समावेश आहे. दरम्यान बुलडाणा, मेहकर, नांदुरा, मोताळा, सिंदखेड राजा, संग्रामपूर तालुक्यात करण्यात आलेल्या संदिग्धांचे तपासणीमध्ये एकही जण बाधित आढळून आला नाही. दुसरीकडे उपचारादरम्यान बुलडाणा शहरातील बजरंग नगरमधील ६० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसरीकडे १३ जणांनी मंगळवारी कोरोनावर मात केली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या ५ लाख ८८ हजार ४६ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ८६ हजार १६४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
--१,१४७ अहवालाची प्रतीक्षा--
अद्यापही १ हजार १४७ संदिग्धांचे अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या आता ८६ हजार ९९३ झाली असून त्यापैकी १६५ सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.