बुलडाणा : राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत जून महिन्यात हिवताप जनजागरण मोहिम राबविण्यात येते. तसेच हा महिना हिवताप जनजागरण महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत एक दिवस एक उपक्रम राबविण्यात येत असून डासोत्पत्ती ठिकाणांमध्ये गप्पी मासे सोडण्यात येत आहेत. बुलडाणा शहरात जिल्हा हिवताप कार्यालयाच्यावतीने जनजागरण रॅली काढण्यात आली. रॅली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. रॅलीला डॉ.वासनेकर यांनी हिरवी झेंडी दाखविली. तसेच शहरातील वार्डात हिवताप जनजागरण सभा घेण्यात आल्या. या सभाप्रसंगी हिवताप विषयक हस्त पत्रिकांचे वितरण करण्यात आले. हिवताप निदानाकरीता आशा वर्कर यांना रक्त नमुने घेणे, कंटेनर सर्वेक्षण याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. आरोग्य कर्मचाºयांमार्फत वार्डांमध्ये जलद ताप सर्वेक्षण व कंटेनर सर्वेक्षण करून दुषित कंटेनरमध्ये डाळ अळी नाशकाचा उपयोग करण्यात आला. तसेच नागरिकांना आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन करण्यात आले. डासोत्पत्ती ठिकाणांमध्ये गप्पी मासे सोडण्याचा धडक कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी नगर परिषद शिक्षण सभापती इंगळे, माजी जि.प सदस्य अशोक इंगळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य सहायक पाखरे, एस.पी जाधव, आर.एस जाधव, जुमडे, वनारे, लोखंडे, पडोळकर, बाहेकर यांनी प्रयत्न केले.
हिवताप जनजागरणसाठी ‘एकदिवस एक उपक्रम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 16:52 IST
बुलडाणा : राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत जून महिन्यात हिवताप जनजागरण मोहिम राबविण्यात येते. तसेच हा महिना हिवताप जनजागरण महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे.
हिवताप जनजागरणसाठी ‘एकदिवस एक उपक्रम’
ठळक मुद्दे मोहिमेतंर्गत एक दिवस एक उपक्रम राबविण्यात येत असून डासोत्पत्ती ठिकाणांमध्ये गप्पी मासे सोडण्यात येत आहेत.बुलडाणा शहरात जिल्हा हिवताप कार्यालयाच्यावतीने जनजागरण रॅली काढण्यात आली. डासोत्पत्ती ठिकाणांमध्ये गप्पी मासे सोडण्याचा धडक कार्यक्रम राबविण्यात आला.