शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

Buldhana Crime : चक्क कुरीयरद्वारे पिस्तुल व मॅगझिनची डिलेव्हरी; एकास अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 12:10 PM

Pistol Found in Curior Box दोन पिस्तुल व मॅगझिन जप्त करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगोपाल रामसिंग शिराळे (रा. साखरखेर्डा) यास ताब्यात घेतले आहे.आरोपीची गुन्हेगारीचीही पार्श्वभूमी असल्याचेही तपासात समोर येत आहे.

 लाेकमत न्यूज नेटवर्कसाखरखेर्डा: येथील बसस्थानकावर कुरियरमध्ये आलेले संशयास्पद बॉक्स ताब्यात घेताना गोपाल रामसिंग शिराळे (रा. साखरखेर्डा) यास अकोला एटीएसच्या पथकाने साखरखेर्डा पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्याच्याकडील बॉक्समधून दोन पिस्तुल व मॅगझिन जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे साखरखेर्डा परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपीची गुन्हेगारीचीही पार्श्वभूमी असल्याचेही तपासात समोर येत आहे. साखरखेर्डा बसस्थानकावर कुरीयर वाल्याकडून एक पार्सल घेवून जात असताना  गोपाल रामसिंग शिराळे यास अटक करण्यात आली. मात्र तो पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र सतर्क असलेल्या पोलिसांनी त्याला लगेच पकडले. दरम्यान तेथून त्यास साखरखेर्डा पोलिस ठाण्यात तेथून आणण्यात आले. तेथे पंचासमक्ष त्याच्या ताब्यताील कुरीयद्वारे आलेला बॉक्स उघडण्यात आला. तेव्हा त्यात दोन पिस्तुल व मॅगझीन जप्त करण्यात आले आहे. सोबतच तीन काडतुसेही पोलिस यंत्रणेने ताब्यात घेतली असल्याची माहिती आहे.दरम्यान संबंधीत आरोपीसोबत गावातील आणखी कोणाचा संबंध आहे का? याचाही तपास सध्या अकोला एटीएस व पोलिस करत आहे. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी आरोपी गोपाळ रामसिगं शिराळे विरोधात साखरखेर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ठाणेदार ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी दिली.

पिस्तुलचा वापर कशासाठी?गोपाळ रामसिंग शिराळे याने दोन पिस्तुल व मॅगझीन असलेले पार्सल स्वीकारले आहे. दरम्यान साखरखेर्डा येथे पार्सलद्वारे हे दोन पिस्तुल मागविण्याचे काम काय? त्याचा कशासाठी वापर होणार होता. यापूर्वीही अशाच पद्धतीने पिस्तुल किंवा तत्सम बाबी आणल्या गेल्या होत्या का? या दिशेने सध्या अकोला एटीएस व पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, मेहकरचे एसडीपीअेा आणि साखरखेर्डा येथील ठाणेदार या प्रकरणाच्या अनुषंगाने एटीएसला अधिक सहकार्य करीत असल्याची माहिती आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी