शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

जंगलातील पक्ष्यांच्या खाद्यासाठी दीड क्विंटल तांदूळ

By admin | Updated: April 26, 2017 00:47 IST

‘वन्यजीव सोरयें’चा उपक्रम : जंगलात पक्ष्यांना दिले जाते अन्न

बुलडाणा : येथील वन्यजीव सोयरे या सामाजिक संस्थेने जंगलातील पक्ष्यांच्या खाद्याची व्यवस्था करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमास विविध सामाजिक कार्यकर्ते व संस्थेने प्रतिसाद दिला असून, रेणुका मंदिर संस्थान आणि बचानंद स्वामी संस्थान चिखली यांचे उपाध्यक्ष गोपाल शेटे यांनी दीड क्विंटल तांदूळ देऊन पुढाकार घेतला आहे.बुलडाणा येथील वन्यजीव सोयरे संस्थेने १२ मार्च रोजी होळीचे औचित्य साधून सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ज्ञानगंगा अभयारण्यात जाऊन १५ ठिकाणी वनातील पक्ष्यांचा विचार करून उन्हाळ्यात वनातील पशू पक्ष्यांचे पाण्यासाठी हाल होऊ नयेत, यासाठी पाणी मातीचे पॉट लावले. याद्वारे पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला; पण वनात पक्ष्यांना खायला पाहिजे तेवढे नसल्यामुळे वण वण भटकंतीचा विचार करून वन्यजीव सोयरे, बुलडाणा यांनी पक्ष्यांना खाद्याची सोय करायचा विचार करून दर रविवारी वन्यजीव सोयरेंनी लावलेल्या पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या पॉट खाली रविवारी सकाळी जेवढे शक्य होईल तेवढे तांदूळ टाकण्यास सुरुवात केली आहे. याद्वारे पक्ष्यांच्या खाद्याची ही सोय होणार असून, पक्ष्यांची भटकंती थांबण्यास मदत होईल, याबाबत खाद्यान्नासाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तत्काळ वन्यजीव सोयरे सागर आवटे यांना दूरध्वनी करून रेणुका मंदिर संस्थान आणि बचानंद स्वामी संस्थान चिखली यांचे उपाध्यक्ष गोपाल शेटे यांनी दीड क्विंटल तांदूळ वन्यजीवांच्या खाद्यासाठी दिला. सदर तांदूळ संस्थानचे अध्यक्ष राजू खरात, उपाध्यक्ष गोपाल शेटे आणि सचिव वसंत शेटे यांच्या हस्ते वन्यजीव सोयरे जयंतकाका हिंगे, सागर आवटे, नितिन व्यवहारे, सूरज वाडेकर आणि नितिन श्रीवास्तव यांच्याकड़े वन्यजीवांच्या खाद्यासाठी दिले. खाद्यान्न देण्यासाठी पुढाकार घ्यावा! ज्ञानगंगा अभयारण्यातून जात असतांना पाण्याच्या पॉटमध्ये पाणी आणि आपल्या जवळ असलेले काही थोड्या प्रमाणात खाद्य पॉट खाली पक्षांना टाकावे जे लोक ज्ञानगंगा अभयारण्यात जाऊन पक्षांना खाद्य असून टाकू शकत नाहीत, त्यांनी वन्यजीव सोयरे सागर आवटे, नितिन व्यवहारे, नितिन श्रीवास, सूरज वाडेकर, जयंत हिंगे आणि गणेश श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधावा व खाद्यान्न द्यावे, असे आवाहन केले होते.