३१ डिसेंबरला श्री गजानन महाराज मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार

By विवेक चांदुरकर | Published: December 27, 2023 05:31 PM2023-12-27T17:31:33+5:302023-12-27T17:31:57+5:30

दरवर्षी नाताळ सुट्या, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी शेगावात मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.

On 31st December Sri Gajanan Maharaj temple will be open for darshan all night | ३१ डिसेंबरला श्री गजानन महाराज मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार

३१ डिसेंबरला श्री गजानन महाराज मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार

शेगाव (अनिल उंबरकर) : नाताळची सुटी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त शेगावात श्रींच्या दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेत संत गजानन महाराजांचे समाधी मंदिर ३१ डिसेंबर रोजी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.

दरवर्षी नाताळ सुट्या, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी शेगावात मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. येणाऱ्या भाविकांना श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ मिळावा व होणाऱ्या गर्दीचे नियोजन योग्यरीतीने व्हावे या उद्देशाने ३१ डिसेंबर रोजी श्रींचे समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री येणाऱ्या भाविकांना पहाटे श्रींचे दर्शन, महाप्रसाद घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करणार आहे.

श्रींच्या भाविकांसाठी संस्थानच्या वतीने दर्शनबारी व श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद, पारायण मंडप, श्रींची गादी तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था केली आहे. तसेच भक्तांच्या सोयीसाठी संस्थानच्या भक्त निवासामध्ये नियमानुसार अल्पदरात राहण्याची व्यवस्था नित्याप्रमाणे सुरू आहे. संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता भक्तांना श्रींच्या प्रति आपली आस्था प्रसन्न मनाने एकरूप करणारी आहे. भक्तांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी श्रींचे सेवेकरी आपली सेवा देण्यास तत्पर आहेत.
भाविकांची वाढती गर्दी पाहता घेतला निर्णय

दरवर्षी देशभरातील लाखो भाविक सरत्या वर्षाला निरोप देत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन नवीन वर्षाला सुरुवात करत असतात. यामुळे ३१ डिसेंबर रोजी लाखोंच्या संख्येने भाविक शेगावात दाखल होतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: On 31st December Sri Gajanan Maharaj temple will be open for darshan all night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.