शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

सुसंवाद कार्यशाळेला शेतकऱ्यांपेक्षा अधिकारीच जास्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 13:53 IST

अपेक्षीत जनजागृती अभावी  शेतकऱ्यांनी या कार्यशाळेकडे पाठ फिरविली.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  तालुका  आणि उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने खामगाव येथे शुक्रवारी आयोजित सुसंवाद कार्यशाळेचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. अपेक्षीत जनजागृती अभावी  शेतकऱ्यांनी या कार्यशाळेकडे पाठ फिरविली. गर्दी जमत नसल्याने कृषी विभागाकडून वेळेवर शेतकºयांना संपर्क साधण्याचा केविलवाणा प्रयत्नही यावेळी करण्यात आला.महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्यावतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत शुक्रवार २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता खामगाव येथील कोल्हटकर सभागृहात खामगाव तालुका आणि परिसरातील शेतकºयांसाठी कृषी सुसंवाद कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कृषी विभागाच्यावतीने अपेक्षीत जनजागृती आणि शेतकºयांशी संपर्क साधण्यात आला नाही. त्यामुळे या सुसंवाद कार्यशाळेकडे अनेक शेतकºयांनी पाठ फिरविली. शेतकरी येत नसल्याचे निदर्शनास येताच कृषी विभागाच्यावतीने समूह सहायक, कृषी सहायक, कृषी मित्र आणि कृषी साहित्य विक्रेत्यांना वेळेवर निरोप देण्यात आले आणि सभागृहात गर्दी जमविण्यात आली.  त्यानंतर दुपारी १२ वाजता नावापुरता हा सुसंवाद कार्यक्रम राबविण्यात आला.

 शेतकऱ्यांपेक्षा अधिकारी आणि कर्मचारीच अधिक!शुक्रवारी खामगाव येथे पार पडलेल्या कृषी सुसंवाद कार्यशाळेला शेतकºयांपेक्षा अधिकाºयांचीच संख्या अधिक होती. यावेळी जळगाव कृषी विद्यापीठाच्या व्याख्यात्यांसह खामगाव तालुका कृषी कार्यालयाचे मंडळ अधिकारी पवार, दहीफळे, ईटे, देशमुख, दाते, भागवतकर, पडवाळ, भवर, सवडतकर, अवचार, दांडगे, डाखोरे, घुले, काकड, जाधव आदी अधिकारी आणि शेतकरी, समूह सहायक, कृषी सहायक या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी अवघे ०७ शेतकरी उपस्थित होते.

 

 कृषी विभागाच्या सुसंवाद कार्यशाळेसंबंधी कोणतीही माहिती आपणास नव्हती. महसूल कार्यालयात काही कामानिमित्त आलो असता, कृषी विभागाचे अधिकारी कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन आले. आमच्या गावातही याबाबत कृषी विभागाकडून निरोप देण्यात आलेला नाही.- ए.एस.आखरेशेतकरी, बोरीअडगाव.

 

 कृषी विभागाकडून शेतकºयांना निरोप देण्यात आले आहेत. कदाचित कार्यशाळेची वेळ आणि दिवस चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकºयांच्या हजेरी पुस्तिकेवर तारीख नसल्याचा प्रकार गंभीर असून संबंधितांना तशी विचारणा केली जाईल. यासंपूर्ण प्रकाराची माहितीही घेतली जाईल.- नरेंद्र नाईकजिल्हा कृषी अधिक्षक, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी