शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

गोदरीत पहारा; उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर रात्रीला ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 18:13 IST

बुलडाणा: संपूर्ण गाव हगणदरी मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या शिक्षकांच्या परिश्रमाला गावकऱ्यांची साथ मिळाल्याने जिल्ह्यातील अंत्री देशमुख हे गाव हगणदरी मुक्त झाले. उघड्यावर बसणाऱ्यांवर रात्रीला जागरण करून गावा लगतच्या गोदरीमध्ये वॉच ठेवला जात आहे. 

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: संपूर्ण गाव हगणदरी मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या शिक्षकांच्या परिश्रमाला गावकऱ्यांची साथ मिळाल्याने जिल्ह्यातील अंत्री देशमुख हे गाव हगणदरी मुक्त झाले. परंतू या गावात आता गोदरीमुक्तीनंतरची कसरत पाहावयास मिळत आहे. सर्वांचे घरी शौचालय असतानाही काही लोकांकडून उघड्यांवर बसण्याचे प्रकार होतात, त्यामुळे याठिकाणी उघड्यावर बसणाऱ्यांवर रात्रीला जागरण करून गावा लगतच्या गोदरीमध्ये वॉच ठेवला जात आहे. राज्यभर हगणदरी मुक्तीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यात जिल्हा परिषदचे शिक्षकही मागे राहिले नाहीत. मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख येथील जि. प. शिक्षक पी. एस. देशमुख, विकास वाझुळकर व इतर शिक्षकांनी संपुर्ण गाव हणदरीमुक्त करण्याचे कार्य २६ जानेवारी २०१७ मध्ये हाती घेतले होते. त्यानुसार सुरूवातीला विरोध, राजकीय द्वेष अशा अनेक अडचणी शिक्षकांना आल्या. मात्र हळुहळू विद्यार्थ्यांच्या मदतीने पालकांची मानसीकता बदलविण्यात या शिक्षकांना यश आले. विद्यार्थीनींच्या भाषणातून गावात शौचालय बांधकामाची जागृती निर्माण करण्यात आली. संपूर्ण  गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी ४४९ शौचालयाचे बांधकाम करणे अपेक्षीत होते. परंतू त्यासाठी लागणारा खर्च कसा भागवायचा, शासनाच्या अनुदानास होणारा विलंब यामध्ये शिक्षकांनी स्वत: च्या खिशाला झळ बसवत शौचालय बांधकामाचा उपक्रम हाती घेतला. यावेळी गावातील संदिप देशमुख यांनी ७५ हजार रुपये व सुरेश देशमुख यांनी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. त्यावर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्याने शौचालय बांधकामाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत गेला. वर्षभरात संपूर्ण गाव हगणदरीमुक्त करण्यात शिक्षक पी. एस. देशमुख यांना यश आले. हगणदरीमुक्तीनंतरही काही लोक उघड्यावर शौचास बसण्याचे सोडत नसल्याचे दिसून आल्याने अंत्री देशमुख ग्राम पंचायत सदस्यांनी गावाला लागून असलेल्या सर्वच गोदरीमध्ये रात्रीला जागरण करून लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सुरेश देशमुख व ग्रामपंचायत सदस्यांनी दररोज रात्री ११ वाजेपर्यंत व सकाळी तीन ते चार वाजेपासून गोदरीमध्ये पहारा देण्याचा नविन उपक्रम सुरू केला आहे. यामुळे येथे उघड्यावर बसणाºयांना आळा घालण्यात आला असल्याचे चित्र आहे.  घरात बांधले शौचालयअंत्री देशमुख येथे घरोघरी शौचालय बांधकाम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असता, अनेक अडचीण समोर आल्या. यामध्ये आर्थिक अडचण प्रामुख्या ने दिसून आली. मात्र आर्थिक मदतीतून हा प्रश्न सुटला. त्यानंतर अनेकांकडे शौचालय बांधकामासाठी जागा नसल्याचे दिसून आले. मात्र यातील काही गोरगरीब कुटूंबांनी घरातच शौचालय बांधकाम केल्याने इतरांसमोर एक आदर्श निर्माण झाला.  हगणदरीमुक्ती मागे विद्यार्थ्यांचे मोठे सहकार्यअंत्री देशमुख हगणदरीमुक्तीसाठी प्रयत्न सुरू केले असता, यात विद्यार्थ्यांचे मोठे सहकार्य लाभले. पालकांसमोर या विद्यार्थ्यांनी शौचालय बांधण्याचा हट्ट केल्याने हा प्रश्न लवकर सुटू शकल्याची माहिती शिक्षक पी. एस. देशमुख यांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकर