शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

उन्हाळ्यात लाखो विद्यार्थ्यांची भूक भागवणार शालेय पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 17:58 IST

बुलडाणा: शाळेला उन्हाळी सुट्या लागल्यानंतर दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार दिला जाणार आहे.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: शाळेला उन्हाळी सुट्या लागल्यानंतर दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार दिला जाणार आहे. जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या दोन लाखावर विद्यार्थ्यांची भूक शालेय पोषण आहारातून भागवली जाणार असून उन्हाळ्यात सर्व विद्यार्थ्यांची बायोमॅट्रीक हजेरी घेतली जाणार आहे. जिल्ह्यात पर्जन्यमान कमी राहिले व शेतातील उत्पादनातही शेतकºयांना मोठा फटका बसला. त्यामुळे जिल्हा दुष्काळाच्या छायेत सापडला आहे. शेतकºयांना खरीपाचे अपेक्षित उत्पन्न आले नाही. त्यामुळे खरीपाची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली; अशा काही गावांमध्ये शासनातर्फे दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. दुष्काळग्रस्त भागामध्ये ६ नोव्हेंबर २०१८ पर्यंत जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा, लोणार, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा व मोताळा या आठ तालुक्यांचा समावेश  करण्यात आला होता. त्यानंतर ८ जानेवारी २०१९ रोजी बुलडाणा, चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, जळगाव जामोद या तालुक्यातील २४६ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. दरम्यान, या दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीतही शालेय पोषण आहार देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शाळा कालावधीत पोषण आहार नियमीत दिला जातो; मात्र आता वार्षिक परीक्षा संपल्यानंतरही दुष्काळग्रस्त गावातील जिल्हा परिषदेसह खाजगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटीतही पोषण आहार देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाहिली ते आठवीपर्यंतच्या जवळपास २ लाख विद्यार्थ्यांना उन्हाळ्यामध्ये शालेय पोषण आहाराचा लाभ देण्यात येणार आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यात या विद्यार्थ्यांची बायोमॅट्रीक हजेरी घेण्यात येणार आहे. त्यामुळे शालेय पोषण आहारात बोगसपणा करणाºयांची गोची निर्माण झाली आहे. परिणामी स्वरूप उन्हाळ्यातील शालेय पोषण आहाराचे वाटप प्रामाणीकपणे करावे लागणार आहे. 

५६ दिवस दिला जाणार आहारजिल्ह्यात एप्रिल अखेरपर्यंत अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू राहतात. साधारणत: १ मे ते २५ जून पर्यंत उन्हाळी सुट्या असतात. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांमधील शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटीत दिला जाणारा पोषण आहार सरासरी ५६ दिवस राहणार आहे. 

उन्हाळ्यातही राहणार तेच ‘मेनू’शालेय पोषण आहारामध्ये तूर डाळ, मसूर डाळ, मटकी, वरण भात, खिचडी यासारखे नियमीत मेनू असतात. शैक्षणिक सत्रामध्ये पोषण आहारात नियमीत दिले जाणारेच मेनू उन्हाळी सुटीतही राहणार आहेत. यामध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना १०० तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दररोज १५० ग्रॅम आहार दिला जाईल. 

 या शाळांचा समावेश दुष्काळग्रस्त भागातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये उन्हाळी सुटीत पोषण आहार दिला जाणार आहे. जिल्हा परिषद शाळेबरोबर खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा