शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

लोणारात येणाऱ्या शैक्षणिक सहलींचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 6:45 PM

लोणार:  शैक्षणिक सहलींवरील कडक नियमावलींचा परिणाम लोणार पर्यटन स्थळावर झाला आहे. यामुळे लोणारात येणाºया शैक्षणिक सहलींचे प्रमाण घटले आहे.

- किशोर मापारी

लोणार:  शैक्षणिक सहलींवरील कडक नियमावलींचा परिणाम लोणार पर्यटन स्थळावर झाला आहे. यामुळे लोणारात येणाºया शैक्षणिक सहलींचे प्रमाण घटले आहे. शिक्षणाधिकाºयांची परवानगी न घेता शैक्षणिक सहली काढल्यास सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक-प्राचार्यांवर कडक कारवाई करण्याचा फतवा शिक्षण विभागाने काढल्याने यावर्षी शैक्षणिक सहलींकडे शाळांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसून येत आहे. लोणार येथे सरोवरापासून मंदिर व विविध प्राचीन कलाकृती पाहण्यासाठी शैक्षणिक सहली मोठ्या प्रमाणावर येतात.  प्राथमिक, माध्यमिक शाळा-महाविद्यालयांनी नियमानुसार सहलींचे आयोजन करावे. सहलीत अनुचित प्रकार घडल्यास मुख्याध्यापक-प्राचार्यांना जबाबदार धरण्यात येईल, अशा सूचना शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, यंदा निसर्गरम्य, पर्यटन, मनोरंजनात्मक व अपघातस्थळी यापुढे शैक्षणिक सहली काढता येणार नसल्याने या वर्षात किती शाळा-कॉलेजांमधून सहली निघतील, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालयांमधून दरवर्षी शैक्षणिक सहली काढण्यात येतात. गेल्या एक-दोन वर्षांपूर्वी सागर किनारी भागात व इतर काही निसर्गरम्य, पर्यटन, मनोरंजनात्मकस्थळी सहली काढण्यात आल्यानंतर त्याठिकाणी अपघात घडले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्राणदेखील गमवावे लागले होते. याचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण विभागाने सहलींसाठी नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयाने नियमानुसारच शैक्षणिक सहली काढाव्यात, अशी सूचना देण्यात आली आहे. स्थानिक शिक्षणाधीकाºयांकडून  परवानगी न घेता सहली काढल्यास मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.शिक्षण आयुक्तालय व शिक्षण संचालनालयाकडून सहलीला परवानगी दिलेल्या स्थानिक शिक्षण विभागाच्या कार्यालयांना दंडात्मक कारवाईसही सामोरे जावे लागले आहे. त्यानंतर सरकारच्या शिक्षण विभागाकडून शैक्षणिक सहली काढण्याबाबत नियमावली तयार करण्यात आली होती. या अशा जाचक अटींमुळे सहलींचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्याचा परिणाम लोणारातील पर्यटनावर झाला आहे. 

सहलीदरम्यान अनुचित प्रकार घडल्यास मुख्याध्यापक जबाबदारविद्यार्थ्यांच्या वैयक्तिक ज्ञानात व विकासात भर पडेल अशा शैक्षणिक, अभ्यासात्मक, संशोधनात्मक ठिकाणीच सहली काढाव्या लागणार आहेत. या सहली काढण्यापूर्वी त्याचे प्रस्ताव शिक्षणाधिकाºयांकडून मंजूर करून घ्यावे लागणार आहेत. सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाºया प्रस्तावांना मान्यता मिळणार आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी हे आदेश आहेत. सहलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास मुख्याध्यापक, प्राचार्यांनाच जबाबदार धरण्यात येणार आहे.

 

शैक्षणिक सहलीसाठी या वर्षापासून शिक्षण विभागाने कडक अटी घातल्याने त्या पूर्ण करून घेण्यास वेळ जाणार आहे. खुरमपूर जिल्हा परिषद शाळेची सहल काढली आहे.- शे. रा. चव्हाण, गटशिक्षणाधिकारी, लोणार.

टॅग्स :buldhanaबुलडाणाlonar sarovarलोणार सरोवर