शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

आता हमालांच्या संपामुळे तूर खरेदी ठप्प

By admin | Updated: April 14, 2017 00:47 IST

नांदुरा- हमालांनी मोजणीचे काम सोडून संप केल्याने बाजार समिती व नाफेडची खरेदी पुन्हा ठप्प पडली. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल परत घेऊन जाण्याचा नाहक त्रास सोसावा लागला.

नांदुरा : मागील दोन दिवसांपासून रात्रीच्या अंधारात हमालांनी ‘एफसीआय’ च्या पोत्यांमध्ये निकृष्ट दर्जाचा तुरीचा व्यापाऱ्यांचा माल भरताना रंगेहात पकडल्यानंतर ११ च्या रात्री पोलीस स्टेशनला झालेल्या तक्रारीवरून काही हमालांना याबाबत विचारणा केली. याचे पडसाद बाजार समितीमधील मोजाईवर झाले व हमालांनी मोजणीचे काम सोडून संप केल्याने बाजार समिती व नाफेडची खरेदी पुन्हा ठप्प पडली. त्यामुळे निराश झालेल्या काही शेतकऱ्यांना त्यांचा माल परत घेऊन जाण्याचा नाहक त्रास सोसावा लागला.एफसीआयची बाजार समितीमधील तूर खरेदी सुरुवातीपासून वादांकित झाली आहे. यापूर्वी ३ मार्चला काही व्यापाऱ्यांचा माल खरेदी होत असल्याचा आरोप झाल्याने काही तुरीचा शेतमाल सील करण्यात आला होता. त्यानंतर बारदाना नसल्याने खरेदी बंदच होती. त्यानंतर पाच दिवसांपूर्वी खरेदी सुरू झाली व ११ एप्रिलच्या रात्री काही हमालांनी रात्रीच्या अंधारात एफसीआयच्या पोत्यांमध्ये निकृष्ट दर्जाची तूर भरणे सुरू केल्याने त्यांना शेतकऱ्यांनी रंगेहात पकडले व आंदोलन केले. त्यानंतर बाजार समितीचे सचिव भगत यांनी रात्री विना परवाना माल मोजणाऱ्या हमालांविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने पोलिसांनी संबंधित हमालांची चौकशी केली. त्यामुळे याचा विरोध करण्यासाठी १३ एप्रिलला दुपारी बाजार समिती आवारातील धान्य मोजणी बंद करून संप सुरू केला. त्यामुळे बाजार समिती यार्डातील हर्रासी बंद पाडल्याने अनेक शेतकऱ्यांना त्यांचा माल परत घरी न्यावा लागल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी बारदाना व खरेदीतील गौडबंगाल यामुळे बंद तूर खरेदी आता हमालांच्या संपामुळे पुन्हा बंद पडली असून, त्याचबरोबर नियमित हर्रासी सुद्धा बंद झाल्याने बाजार समितीचा कारभार ठप्प झाला आहे. शेतकऱ्यांना नाहक हेलपाटेसंपाची पूर्वकल्पना नसल्याने शेतकऱ्यांनी सकाळी त्यांचा माल हर्रासीमध्ये टाकला; मात्र हमालांच्या संपामुळे त्याची हर्रासी झालीच नाही. अखेर अनेकांनी तो पुन्हा पोत्यांमध्ये भरून घरी नेला. त्यामुळे या संपाचा नाहक त्रास शेतकऱ्यांना झाला, तरी एफसीआयला तूर विकण्यासाठी मागील पन्नास दिवसांपासून बाजार समितीमध्ये प्रतीक्षा करणाऱ्यांचा पुन्हा हिरमोड झाला.