शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील शिक्षकांसाठी आता ‘निष्ठा’ प्रशिक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 14:27 IST

या उपक्रमांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ७५२३ शिक्षकांना प्रशिक्षण दिल्या जाईल.

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शाळांच्या समग्र प्रगतीसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने पहिली ते आठवीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना तसेच मुख्याध्यापक ,केंद्रप्रमुख यांच्यासाठी ‘निष्ठा’(‘नॅशनल इनिशिटीव्ह फॉर स्कूल हेडस् अ‍ॅन्ड टीचर्स होलीस्टीक अ‍ॅडव्हासमेन्ट)प्रशिक्षण दिले जाणार आहे.या उपक्रमांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ७५२३ शिक्षकांना प्रशिक्षण दिल्या जाईल. यासाठी जिल्ह्यात बारा केंद्र स्थापन करण्यात आले असून प्रत्येक केंद्रांवर पाच केंद्रीय साधन व्यक्तींच्या आणि १२ राज्य स्त्रोत व्यक्तींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गुणवत्ता संवर्धन आणि आनंददायी शिक्षणासाठी शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, मेहकर, खामगाव , शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा, मोताळा या बाराही तालुक्यांच्या ठिकाणी ‘निष्ठा’ बाबत प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.नांदुरा व मलकापूर तालुक्यांसाठी नांदुरा येथील प्रशिक्षण केंद्रावर निष्ठा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यस्तरावर हे प्रशिक्षण १९ ते २३ डिसेंबर या कालावधीत हे शिबीर आयोजित करण्यात आले असून ३० डिसेंबर पासून बुलडाणा जिल्ह्यातील बारा केंद्रांवर हे प्रशिक्षण प्रत्येकी पाच दिवसांच्या टप्प्याने पूर्ण करण्याचे नियोजित केले आहे.

प्रभावी अंमलबजावणीसाठी उपाययोजना!निष्ठा प्रशिक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय नियोजन बैठक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा येथे संस्थेचे प्राचार्य विजयकुमार शिंदे यांचे मार्गदर्शनात पार पडली. यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक एजाज खान उपशिक्षणाधिकारी प्राथमिक एस .टी. वराडे यांचेसह जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ .रवी जाधव, अधिव्याख्याता राजेश गवई, धम्मरत्न वायवळ, रविंद्र सोनुने, राजेंद्र अजगर , श्रीमती सुजाता भालेराव तसेच जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे गटशिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील विषय सहायक व समुपदेशक यांची उपस्थिती होती .

निष्ठा प्रशिक्षणामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांचा कृतीयुक्त सहभाग घेण्यात येईल. जिल्ह्यातील प्रत्येक प्रशिक्षण केंद्रावर एका टप्प्यात १५० प्रशिक्षणार्थ्यांना समाविष्ट केले जाणार आहे. जिल्ह्यात हे प्रशिक्षण यशस्वी करावे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.- विजयकुमार शिंदेप्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलडाणा.

टॅग्स :khamgaonखामगावTeacherशिक्षकbuldhanaबुलडाणा